Wednesday, April 24, 2024
Homeनगरकाँग्रेसच्या श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी बडाख

काँग्रेसच्या श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी बडाख

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी मालुंजा बुद्रुक येथील शहीद जवान

- Advertisement -

भाऊसाहेब बडाख सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णुपंत मुरलीधर बडाख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे कार्य करण्यासाठी व ‘गाव तेथे काँग्रेस संघटना’ निर्माण करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही निवड करण्यात आली असल्याचे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

नियुक्तीच्यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव वाफारे, देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, सोपानराव भांड, जी. एन. बडाख, किशोर बडाख, चांगदेव बडाख आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या