Friday, April 26, 2024
Homeनगरआमच्या आरक्षणाला धक्का लावू नका; ओबीसींची मागणी

आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका; ओबीसींची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लोकसंख्येच्या 52 टक्के असलेल्या ओबीसींना केवळ 17 टक्के आरक्षण मिळत आहे. ओबीसींमध्ये चारशे पेक्षा जास्त जाती आहेत.

- Advertisement -

आहे तेच आरक्षण अपुरे असल्याने आमच्यावर अन्याय होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास आमचा विरोध नाही मात्र आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी काल श्रीरामपूर येथे तहसील कार्यालयावर ओबीसींनी निदर्शने आंदोलन करून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.

श्रीरामपूर तहसील कार्यालयावर काल श्रीरामपूर तालुक्यातील ओबीसींच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन निदर्शने करण्यात आली. व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदार प्रशांत पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय जगताप, शिंपी समाज संघटनेचे इंजि.विजय शिंपी, सुवर्णकार समाजाचे सुरेश मैड, तेली समाजाचे राजेंद्र शिंदे, समता परिषदेचे चंद्रकांत झुरंगे, माळी समाजाचे दत्तात्रय साबळे आदिंसह या आंदोलनाच्या मागण्यांना व आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भटक्या विमुक्तचे आनंदा साळवे, बेलदार कुमावत समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे, दलीत संघटनेचे राम भारस्कर, सुरेश खैरनार आदींसह अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी लोकसंख्येच्या 52 टक्के असलेल्या ओबीसींना केवळ 17 टक्के दिले गेले आहे. त्यात केवळ 12 टक्के जागा भरल्या गेलेल्या आहेत. आज सर्वांना मिळून केवळ 27 टक्के आरक्षण मिळत आहे. हे अन्याय कारक आहे. मराठा समाजाच्या आरक्षणास आमचा विरोध नाही पण आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यास दुबळ्या, मागासलेल्या, बलुतेदार व अलुतेदार असलेल्या ह्या सर्व कष्टकरी जातींवर न भुतो न भविष्यती अन्याय होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी डॉ. राजेंद्र लोंढे, समता परिषदेचे जिल्हा सरचीटणीस प्रकाश कुर्‍हे, संघटक व आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड, शहराध्यक्ष कृष्णा पुंड, सोमनाथ बोर्डे, बाबासाहेब आहीरे, सुरेश खैरनार, अरविंद गिरमे, बाळासाहेब गुलदगड, विवेक गिरमे, अशोक सोनावणे, रणजीत गिरमे, शंकरराव पुंड, नरेंद्र कुर्‍हे, सुनील अनाप व सुनील पांढरे आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या