Tuesday, May 14, 2024
Homeनगरहातभट्टी दारु अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

हातभट्टी दारु अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

श्रीरामपूर | प्रतिनिधी

शहरातील गोंधवनी (Gondhwani) परिसारत असलेल्या गावठी दारु अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी 2 हजार 800 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तसेच 140 लिटर गावठी हातभट्टी दारू व इतर साहित्य असा 2 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दारु अड्डे उध्वस्त केले.

- Advertisement -

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात (Police Sation) 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. भल्या पहाटे व अचानक केलेल्या या कारवाईमुळे श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.

श्रीरामपूर शहरातील गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांना मिळाल्याने त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना या ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोंधवणी परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश केला.

यावेळी पोलिसांनी गोंधवणी येथील अशोक काशिनाथ शिंदे याचेकडून 42,000 रु. किंमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 250 रू किंमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, अशोक सिताराम गायकवाड याचेकडडून 45,500 रु. किंमतीचे 650 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 3000 रू किंमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, राजेंद्र फुलारे याचेकडून 42,000 रु. किंमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 3000 रू किंमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, दिलीप नाना फुलारे याचेकडून 28,000 रु. किंमतीचे 400 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 2000 रू किंमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू आणि सुरेश फुलारे याचेकडून 42,000 रु. किंमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 3500 रू. किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण 2 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या पाच जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस सब इन्स्पेेक्टर ऊजे, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, श्याम बनकर, आदिनाथ चेमटे, प्रदीप गर्जे, सलमान कादरी, गौतम दिवेकर व आरसीपी पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या