Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर बाजार समितीत कांदा 1600 रुपये

श्रीरामपूर बाजार समितीत कांदा 1600 रुपये

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक चांगल्याप्रकारे होत आहे. दरही चांगला मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. आवक वाढत असल्याने मोठी उलाढाल होत आहे. काल शुक्रवारी 20 हजार 568 कांदा गोण्यांची आवक झाली असून कांद्याला 1600 रुपये भाव मिळाला आहे. तर टाकळीभान उपबाजारात कांद्याला 1505 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

यावेळी एक नंबर कांद्याला 1000 ते 1600 रुपये, दोन नंबरला 550 ते 900 रुपये, तीन नंबर 100 ते 500 रुपये तर गोल्टी कांद्याला 800 ते 1200 रुपयांचा दर मिळाला आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात विक्रमी कांदा आवक होत आहे. दरही चांगला मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. आवक वाढत असल्याने मोठी उलाढाल होत आहे. काल शुक्रवारी 4 हजार 109 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यात कांद्याला 1505 रुपये भाव मिळाला आहे.

यावेळी एक नंबर कांद्याला 1050 ते 1505 रुपये, दोन नंबरला 600 ते 1 हजार रुपये, तीन नंबर 300 ते 550 रुपये तर गोल्टी कांद्याला 600 ते 1 हजार रुपयांचा दर मिळाला.

जिल्ह्यात अन्य बाजार समित्यांमध्ये असलेल्या भावाच्या तुलनात्मक जादा दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी या श्रीरामपूर बाजारला पसंती देत आहेत. परीसरातील शेतकर्‍यांनी आपला कांदा श्रीरामपूर बाजारातच विक्रीस आणावा, असे आवाहन चेअरमन संगीता शिंदे, व्हा. चेअरमन नितीन भागडे, सचिव किशोर काळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या