Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरथकबाकीसह पूर्ण रकमेचा कर भरणा केल्यास 1 टक्का सवलत

थकबाकीसह पूर्ण रकमेचा कर भरणा केल्यास 1 टक्का सवलत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपालिका मालमत्ता कर व पाणीपट्टी बिले थकबाकीसह संपूर्ण रकमेच्या भरणा केल्यास चालू वर्षाच्या संकलित करामध्ये 1 टक्का सवलत व मालमत्ता कराचा उतारा एक वेळ मोफत देण्यात येईल. सवलती व सुविधाचा लाभ घेऊन वेळेत कर भरणा करून नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

- Advertisement -

शहरातील नागरिक, मालमत्ता व नळ कनेक्शनधारक व व्यावसायिक दुकानदार व व्यापारी वर्गास आर्थिक वर्ष सन 2022-23 या वर्षाची मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची बिले वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. सदर बिले मिळताच 15 दिवसांच्या आत थकबाकीसह संपूर्ण रकमेच्या भरणा केल्यास चालू वर्षाच्या संकलित करामध्ये 1 टक्का सवलत व मालमत्ता कराचा उतारा एक वेळ मोफत देण्यात येईल तसेच माजी सैनिक यांना स्वतःचा अथवा पत्नीच्या नावे असणार्‍या एका मालमत्तेच्या मालमत्ता करात शासन निर्णयाप्रमाणे सवलत देण्यात येईल. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने शासनाच्या निर्देशनानुसार ‘हर घर झेंडा मोहीम’ राबविण्यात येत असल्याने संपूर्ण कर भरणा करणार्‍या नागरिकांना राष्ट्रध्वज मोफत दिला जाणार आहे.

तसेच नागरिकांच्या सोयीसाठी नगरपालिकेच्या www.shrirampurmc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच नगरपालिकेत कर भरणा केंद्रावर फोन पे, गुगल पे ,क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे कर भरणा करण्याच्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तरी वरील सर्व सवलती व सुविधांचा लाभ घेऊन वेळेत कर भरणा करून नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या