Friday, April 26, 2024
Homeनगरसरकारच्या घोषणेचा मृत्यू

सरकारच्या घोषणेचा मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लॉकडाऊनमुळे शेतकरी, छोटे व्यावसायिक, व्यापारी, संघटित – असंघटित कामगार, मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार

- Advertisement -

असे सर्वचजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा बिकट परिस्थितीत शासनाकडून मदत मिळण्याऐवजी, ज्यात राज्यातील काही उतावळ्या मंत्र्यांनी मोठ्या तोर्‍यात घोषणा दिली की 50 टक्के वीज बील माफ करू; परंतु राज्यातील तीन तोंडी राज्य सरकारने, 50 टक्के वीज बील माफी तर सोडाच, पण ग्राहकांना वाढीव वीजबिले देऊन, वीजबिल न भरल्यास, लाईट कनेक्शन कट करण्याची भाषा राज्यातील तीन तोंडी सरकार करत असल्याने, सिटीझन्स जस्टीस प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र या पत्रकार संघाच्या आयोजनाखाली श्रीरामपूर येथे सर्व पक्षियांच्यावतीने हिंदू स्मशानभूमीत, राज्यातील तीन तोंडी सरकारच्या घोषणेचे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, या आंदोलनाकरिता बनविण्यात आलेली श्राद्धाची पत्रिका, ज्यात कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की, राज्य सरकारच्या सुंदर घोषणेचा अपघाती मृत्यू झाला असून, घोषणा मेल्याने उभा महाराष्ट्र हळहळत आहे. हे दुःख व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच माय बाप सरकार तीन तोंडाचे (पक्षांचे) कोणत्या तोंडाकडे पहावे? असा सवाल देखील या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलकांनी उपस्थित केला. आंदोलनादरम्यान हिंदू प्रथेप्रमाणे पुरोहित राजेंद्र जोशी यांनी श्राद्ध पूजा केली.

सदरच्या या आंदोलनास सिटीझन्स जस्टीस प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष कामगार नेते नागेश सावंत, राज्य सरचिटणीस राजेंद्र नारायणे, आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, शेतकरी संघटनेचे अहमदभाई जहागिरदार, वंचीत आघाडीचे चरण त्रिभुवन, डॉ. मुठे, आपचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जोएब जमादार, आशिष परदेशी, बी.एम पवार, भारत जाधव, दानिश शाह, विष्णू भागवत, राजू यादव, आशिष परदेशी, दीपक परदेशी, राहुल रणपिसे, राहुल केदार, किरण गायकवाड, संदेश आजगे, तसेच भारती शिंदे, अंबिका प्रधान, मंदा कसबे,ज्योती राठोड, कुसुम पवार, सिंधू बनकर, लता माळी, शोभा पवार आदी महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या