व्यापारी बोराने श्रीरामपुरातील हॉटेलचालक महिलेस 17 लाख 75 हजारांस फसविले

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

विश्वासात घेऊन तुम्ही माझ्यासोबत सोयाबीन व इतर धान्य खरेदी करण्यात माझ्यासोबत पैसे गुंतवले तर मी तुम्हाला दाम दुप्पट करून देईल,

असे म्हणून वेळोवेळी हॉटेल चालक विजया भगवान पवार या महिलेकडून बँक खात्यातून रोख रक्कम 17 लाख 75 हजार रुपये काढून ते पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे मागितले असता व्यापार्‍याने शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा या व्यापार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील शिरसगाव हद्द इंदिरानगर या भागात राहणार्‍या हॉटेल चालक महिला विजया भगवान पवार (वय 55 वर्ष) या महिलेस नवल रमणलाल बोरा (रा. वर्धमान हौसिंग सोसायटी, श्रीरामपूर) याने विश्वासात घेऊन तुम्ही माझ्यासोबत सोयाबीन व इतर धान्य खरेदी करण्यात माझ्यासोबत पैसे गुंतवले तर मी तुम्हाला दाम दुप्पट करून देईल, असे म्हणून वेळोवेळी विजय भगवान पवार या महिलेकडून बँक खात्यातून रोख रक्कम 17 लाख 75 हजार रुपये स्वतःच्या फायद्याकरता विश्वासाने घेऊन विजय पवार या महिलेच्या मालमत्तेचा वापर करून महिलेने पैसे मागितले असता तिला पैसे देण्यास टाळाटाळ करून शिवीगाळ करून फसवणूक करून धमकी दिली.

याप्रकरणी विजया बबन पवार यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 209/2021 प्रमाणे नवल रमणलाल बोरा याच्याविरुद्ध भादवि कलम 420,504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरवाडे हे पुढील तपास करीत आहेत. संबंधित पोलीस यांच्याशी संपर्क साधला असता आरोपींचा तपास सुरू आहे असे त्यांनी सांगितले.

नवल रमणलाल बोरा याने यापूर्वीही वडाळा महादेव परिसरातील सोयाबीन खरेदी प्रकरणी शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र बोरा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *