Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीरामपूरच्या गटविकास अधिकारी विरोधात पंचायत समिती पदाधिकार्‍यांची झेडपी सीईओंकडे तक्रार

श्रीरामपूरच्या गटविकास अधिकारी विरोधात पंचायत समिती पदाधिकार्‍यांची झेडपी सीईओंकडे तक्रार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांच्या विरोधात तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे यांच्यासह सदस्यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब तोरणे यांच्याकडे तक्रारी केली आहे. गटविकास अधिकारी धस यांचा पंचायत समितीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुरूवारी सदस्य नवले, उपसभापती तोरणे यांच्यासह पंचायत समिती सदस्य दीपक पटारे, संगिता गांगुर्डे, कल्याण कानडे आणि वैशाली यांच्या सहिनेचे पत्र मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले आहे. या पत्रात गटविकास अधिकारी धस यांनी 17 डिसेंबरचा सर्वोच्च न्यायालयाने श्रीरामपूर पंचायत समितीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात येवू नयेत, असे आदेश असतांनाही 28 डिसेंबरला पंचायत समितीची सभा घेत धोरणात्मक निर्णय घेतले. या सभेच्या इतिवृत्ताची मागणी करून ही ते देण्यात येत नाही. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे.

तसेच शासकीय योजना राबवितांना घरकुल, नरेगा, स्वच्छ भारत, दलित वस्ती व इतर लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आर्थिक मागणी करण्यात येत आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रार येत आहेत. तसेच पंचायत समिती कार्यालयीन कर्मचारी, ग्रामसेवक व कंत्राटी कर्मचारी यांना असभ्य भाषा, अरेरावी व हिनतेची वागणूक देण्यात येत आहे. यामुळे कर्मचारी मानसीक धडपणा खाली आहेत. समन्वयाचा अभाव असल्याने कोणतेच विकास कामे होत नाहीत. आरोग्य सेवा कोलमडली आहे. राजकीय हेतून प्रेरित होवून धस हे काम करत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

यापूर्वीही नगर जिल्हा परिषदेत काम करत असतांना धस यांनी विहीरीच्या कामात अनियमितता व गैरप्रकार केल्याचे उघड झाले होते. तसेच मंठा (जि. जालना) पंचायत समितीमध्ये देखील धस यांनी अनेक गैरप्रकार केलेले आहेत. त्या ठिकाणी देखील पदाधिकारी व नागरिकांना अवमानास्पद वागणूक दिली होती. यामुळेच त्यांची श्रीरामपूरला बदली करण्यात आलेली आहे. धस यांच्यामुळे आता श्रीरामपूर पंचायत समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याने त्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या