Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरश्रीरामपूर जिल्हा करून नगरचे माऊलीनगर नामांतर करावे

श्रीरामपूर जिल्हा करून नगरचे माऊलीनगर नामांतर करावे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात जिल्ह्याचे वेळप्रसंगी त्रिभाजन करा, मात्र प्रायोगिक तत्वावर श्रीरामपूर जिल्हा एकदाचा घोषित करा, तसेच नगर शहराचे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनगर नामांतर व्हावे, आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावे, या मागणीचे निवेदन श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खा. डॉ. सुजय विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे यांना दिले.

- Advertisement -

महसूल परिषद-2023 च्या निमित्ताने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री लोणी येथे आले होते. त्यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या महसूल परिषदेतील शिंदे-फडणवीस सरकारची उपस्थिती जिल्हा विभाजनाला पोषक ठरू शकते. आजमितीला अनेक शहरांचे नामकरण झाले. या पार्श्वभूमीवर 726 वर्षांपूर्वी जिल्ह्यात नेवासा येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. म्हणून सामंजस्यातून नगर शहराला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनगर नामांतर केल्यास तो ऐतिहासिक निर्णय होईल.

तसेच जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला असून त्यांचे कार्य देशभर सर्वश्रुत आहे. म्हणून अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मरणोत्तर भारतरत्न हा मानाचा पुरस्कार देण्याचा निर्णय होणे अपेक्षित आहे. हा निर्णय झाल्यास सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडेल.

वेळप्रसंगी शासनाचा जिल्ह्याचे त्रिभाजन करणे हा पर्याय सर्वार्थाने हितावह ठरू शकेल. निकषाचे आधारे श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आणि नगर शहराचे माऊलीनगर नामांतर तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना भारतरत्न देणेसाठी एकत्रित निर्णय होणे अपेक्षित आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजी-माजी लोकप्रतिनिधींनीसह सरपंच-उपसरपंच, आध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध प्रतिष्ठाने, विविध संघटनेचे प्रतिनिधीनी केलेले ठराव किंवा सह्यांचे पाठिंबा पत्र देऊन लोकसहभाग नोंदवावा, असे आवाहन राजेंद्र लांडगे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या