Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीरामपूर-दत्तनगर रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ ‘गोट्या खेळो’ आंदोलन

श्रीरामपूर-दत्तनगर रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ ‘गोट्या खेळो’ आंदोलन

टिळकनगर |वार्ताहर| Tilknagar

श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून आंदोलन करुनही लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष करून कानाडोळा केल्याच्या निषेधार्थ काल शनिवारी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक लोंढे यांच्या नेतृत्वाखालील रस्त्यावरील खड्यात गोट्या खेळो आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

श्रीरामपूर ते दत्तनगर गावापर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डेच खड्डे पडले आहेत. दुचाकी व चार चाकी वाहन चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते. अनेक छोटे मोठे अपघात घडूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेताना दिसत आहे. या रस्त्यावर नेहमीच ये जा करणारे लोकांच्या मणक्याचे आजार बळावत असून, रस्त्यावर सर्वत्र धुळीचे व खड्ड्याचे साम्राज्य पहावयास मिळत असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

याअगोदर लोंढे व त्यांच्या सहकार्‍यांनी याच रस्त्यावर भिक मांगो आंदोलन, मुंडण आंदोलन, रस्त्यात झाडे लावून आंदोलन, रस्त्यावर झोपून आंदोलनासह अनेक आंदोलने करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याला मर्जीच्या ठेकेदाराला हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे काम करण्याची सवय झाली आहे, तशी आम्हालाही लोकशाही मार्गाने आपले प्रश्न उपस्थित करण्याची सवय झाली आहे. ऐन गणपती उत्सवात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर विघ्नहर्ता स्थापना झाली असून, रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे. परंतू रस्त्यावरील खड्यांचे विघ्न कधी जाईल, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

याप्रसंगी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, रिपब्लिकन पक्षाचे तालुका संघटक संजय बोरगे, प्रहारचे शहर अध्यक्ष सागर दुपाटी, कामगार नेते बबन माघाडे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, भाजपचे युवा नेते सुनिल निकम, संजय शिरसाठ, संतोष निकम, संजय थोरात, सचिन शिंदे, अमोल जाधव, विश्वास कोळगे, वाल्मीक निकम, प्रदिप शेळके, राजू त्रिभुवन, स्वप्नील सोनार आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या