Friday, April 26, 2024
Homeनगरदुचाकीस्वारांना मारहाण करुन लुटमार करणार्‍या गुन्हेगारांची टोळी जेरबंद

दुचाकीस्वारांना मारहाण करुन लुटमार करणार्‍या गुन्हेगारांची टोळी जेरबंद

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील हरेगाव येथून मोटारसायकलवरुन निमगाव खैरीमार्गे श्रीरामपूरकडे येत असताना निमगाव खैरी परिसरात आल्यानंतर पाठिमागून मोटारसायकलवरुन आलेल्या चार जणांनी मोटारसायकल थांबवून त्यास मारहाण करुन त्याच्याकडून एटीएम कार्ड, चेकबुक, पॅनकार्ड, मतदान कार्ड, मोबाईल, मोटारसायकलची चावी व रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने काढून लूट केल्याप्रकरणातील चार जणांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

श्रीरामपूर गोंधवणी येथील अंकुश अशोक करंडे हे हरेगाव येथून मोटारसायकलवरुन निमगाव खैरीमार्गे श्रीरामपूरकडे येत असताना निमगाव खैरी परिसरात आल्यानंतर पाठिमागून मोटारसायकलवरुन आलेल्या चार जणांनी मोटारसायकल थांबवून करंडे यांना मारहाण करुन त्याच्याकडून एटीएम कार्ड, चेकबुक, पॅनकार्ड, मतदान कार्ड, मोबाईल, मोटारसायकलची चावी व रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने काढून लूट केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व पोलीस पथकाने तपास केला असता तालुक्यातील उक्कलगाव येथील गोविंद बाळासाहेब गुंजाळ व त्याच्या साथीदारानी हा गुन्हा केला असल्याची बातमी मिळाली त्यानुसार या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, पोलीस नाईक अण्णा पवार, रवींद्र कर्डिले, दिपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघ, मयुर गायकवाड, सागर ससाणे, व चालक सचिन कोळेकर यांनी श्रीरामपूर येथे जावून गोविंद बाळासाहेब गुंजाळ याचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारांसमवत घडवून आणला असल्याची कबुली दिली.

त्याचे साथीदार सुदाम कडुबाळ सरकाळे (रा. शहरटाकळी, शेवगाव), करण नवनाथ गायकवाड (रा. निपाणीवडगाव, श्रीरामपूर)यांना बीड जिल्ह्यातील गेवराई येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विवो कंपनीचा 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले 75 हजार रुपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची अपाची मोटारसायकल असा 83 हजार रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. यातील त्यांचा चौथा साथीदार मात्र मिळून आला नाही.

यावेळी या आरोपींनी श्रीरामपूर शहर पोलीस क्षेत्रात सात, तोफखाना पोलीस स्टेशन परिसरात, राहुरी पोलीस स्टेशन आवारात दोन, राहाता, सोनई या ठिकाणी गुन्हे केले आहेत.सुदाम सरकाळे याने कोतवाली चार, तोफखाना दोन, श्रीरामपूर शहर, सोनई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर करण गायकवाड याचे विरुध्द सोनई पोलीस ठाण्यात यापूर्वी केलेले गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या