Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 79 करोनाचे रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 79 करोनाचे रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल सलग दुसर्‍या दिवशीही 79 रुग्ण सापडले आहे.

- Advertisement -

तर 372 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 93 टक्के रुग्ण बरे झाल्याचे दिसून येत आहे.

श्रीरामपूर तालुक्यात काल सलग दुसर्‍या दिवशीही 79 करोना बाधीत रुग्ण सापडले आहे. जिल्हा रुग्णालयात 02, खासगी रुग्णालयात 54 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 23 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 52 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 372 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 750 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 378 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत तर सध्या एकूण अंदाजे 372 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या