Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीरामपुरात भाजपाच्यावतीने वीज बिलाची होळी

श्रीरामपुरात भाजपाच्यावतीने वीज बिलाची होळी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राज्यातील आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी व जनतेची होरपळ केली असून घोर फसवणूक होत आहे.

- Advertisement -

त्यामुळे या फसव्या सरकारचा श्रीरामपुरातील भाजपाच्यावतीने वीजबीलाची होळी करून निषेध करण्यात आला. यावेळी वीजबिल माफ झाले पाहिजे. करोना काळातील न वापरलेल्या विजेची बिले माफ झालीच पाहिजेत, अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी परीसर दणाणून गेला होता.

बेसुमार वीजबीलवाढीविरोधात भाजपाचे आंदोलन करण्यात आले. या सरकारने करोना काळातील वीजबिले माफ करण्याची घोषणा केली होती; परंतु आता हेच सरकार वीजबिल माफीस नकार देत आहे.

याबाबत राज्यातून वीज ग्राहक जनता व भाजपाने मोठ्या प्रमाणात आवाज उठविल्यानंतर 100 युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचे आश्वासन तिघाडी सरकारच्यावतीने देण्यात आले होते. तसेच उर्जामंत्र्यांनीही वारंवार प्रसार माध्यमातून वीजबिल माफी प्रस्ताव राज्य सरकारला सांगितले होते, पण आता उर्जामंत्र्यांनी मात्र पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत अर्थमंत्र्यांकडे बोट दाखविले आहे. अर्थमंत्र्यांनी वीजबिल माफीच्या प्रस्तावाची फाईल फेटाळली आहे.मुख्यमंत्री मात्र याच विषयावर मूग गिळून गप्प आहेत.

यावेळी शहराध्यक्ष मारूती बिंगले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, शशिकांत कडुसकर, अरुण धर्माधिकारी, मिलिंदकुमार साळवे, डॉ. ललित सावज, इंजि. चंद्रकांत परदेशी, अ‍ॅड.किरण जर्‍हाड, अमित मुथ्था, रूपेश हरकल, बाळासाहेब हरदास, विशाल गायधने, अशोक लोंढे, हर्षल थापा, रवी पंडित, सोमनाथ परदेशी, विजय लांडे, जयराम वाघ, जयराम बोरकर तसेच युवामोर्चाचे विशाल यादव, गणेश बिंगले, आनंद बुधेकर, सांस्कृतिक आघाडी जिल्हा संयोजक बंडुकुमार शिंदे, बंटी अडांगळे, गणेश करमासे,अक्षय नागरे, पंकज ललवाणी, विशाल अंभोरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या