Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपूरची बेग टोळी जिल्ह्यातून हद्दपार

श्रीरामपूरची बेग टोळी जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

श्रीरामपूर शहर व परिसरामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या चेन्या बेग टोळीला अहमदनगर जिल्ह्यातून 18 महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंजुरी देत याबाबतचे आदेश काढले आहेत. बेग टोळीतील सहा जणांचा यामध्ये समावेश आहे.

- Advertisement -

टोळी प्रमुख सागर ऊर्फ चेन्या अशोक बेग (वय 33), टोळीसदस्य आकाश ऊर्फ टिप्या अशोक बेग (वय 28), जयप्रकाश ऊर्फ सोन्या ऊर्फ सोनू अशोक बेग (वय 38), गोरख ऊर्फ गोर्‍या विजय जेधे (वय 21, सर्व रा. वार्ड नंबर सहा, डावखर रोड, श्रीरामपूर), सुधीर अरूण काळोखे (वय 37 रा. वार्ड नंबर सात, सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) व लखन प्रकाश माखिजा (वार्ड नंबर एक, श्रीरामपूर) अशी हद्दपार केलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

श्रीरामपूर शहर, संगमनरे शहर, लोणी, शिर्डी, तोफखाना, श्रीरामपूर तालुका, कोपरगाव शहर तसेच नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड व औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करून घातक शस्त्र जवळ बाळगून खून करणे, खूनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बेकायद्याची मंडळी जमविणे, हल्ला करून दुखापत करणे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करणे, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी करणे, पळवून नेवुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे अशा प्रकारचे 27 गुन्हे बेग टोळीविरूध्द दाखल आहेत. सदर टोळीला अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी ऑक्टोबर, 2021 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता.

या प्रस्तावावर जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी निर्णय घेत बेग टोळीविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये 18 महिन्याकरीता हद्दपार करण्याबाबत आदेश काढले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या