Saturday, April 27, 2024
Homeनगरगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी श्रीरामपूरकडे लक्ष देणार - एसपी ओला

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी श्रीरामपूरकडे लक्ष देणार – एसपी ओला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर हे जिल्ह्यात संवेदनशील म्हणून ओळखले जाते. सध्या गुन्हेगारी नियंत्रणासाठी येथील अधिकारी चांगले काम करत आहेत. तरीही श्रीरामपुरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी श्रीरामपूरकडे जास्त लक्ष देणार असल्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दिले.

- Advertisement -

काल श्रीरामपूर येथे अचानक भेट देवून सर्व पोलीस विभागाची पहाणी करुन कोणकोणत्या गोष्टीची अपूर्णता आहे याची तपासणी केली. यावेळी पोलीस ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. श्रीरामपूरला कंट्रोल रुम असावे अशी बर्‍याच वर्षापासूनची मागणी आहे मात्र ती अद्यापही पूर्ण होवू शकली नाही. मात्र माझ्या कालावधीत मी पाठपुरावा करुन कंट्रोल रुमसाठी प्रयत्न करील.

श्रीरामपूर शहर हे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. यापूर्वी या ठिकाणी काम केले असल्यामुळे याबाबतची माहिती असल्यामुळे त्याद़ृष्टीन गुन्हेगारीची माहिती आहे. मलाही वाटते की प्रशस्त अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय असावे, पोलीस उपअधिक्षक कार्यालय तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन अद्यावत असावे. मात्र जागेची अडचण आहे. जागा जरी असली तरी ती देण्याचे मोठे मन सरकारने केेले तर ती पूर्ण होवू शकते. या ठिकाणी असलेला पोलीस फोर्स अधिक असावा, वाहतुकीची समस्याही बिकट आहे ती पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे तो प्रश्न भेडसावत आहे. पोलिसांना रहाण्यासाठी घरेही सध्या अपुरे पडत आहेत.

सध्या श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असले तरी या ठिकाणचे पोलीस उपअधिक्षक मिटके व पोलीस निरीक्षक गवळी यांचे चांगले कार्य चालू आहे. ते गुन्ह्याचा तपास चांगल्या पध्दतीने करत आहेत. तरीही या परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे याबाबत पोलिसांनी सतर्क रहावे, ठिकठिकाणी जावून मोटारसायकलीची सखोल चौकशी करावी, यामुळे मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढणार नाही. गुन्हेगारी संदर्भातील कोणतीही गोष्ट असेल त्याबाबत पोलिसांना सांगावे किंवा संवाद साधावा. त्याची शहनिशा करुन त्याबाबत कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या