Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आ. लहु कानडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डिजिटल सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अशोक कानडे यांनी मतदारसंघाचा दौरा चालू केला आहे. ते श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील 32 गावांमध्ये गावोगांवी जाऊन नागरिकांची भेट घेत काँग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नोंदणी अभियान राबवत आहे.

- Advertisement -

सध्या देशभरात काँग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नोंदणी अभियान चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल नोंदणी अभियान सुरु आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आ. लहू कानडे यांच्या माध्यमातून नोंदणी अभियान चालू आहे. डिजीटल सभासद नोंदणी अभियानाबाबत आ. कानडे यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मतदारसंघातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, नगरपालिकांचे प्रभाग यांचे बुथनुसार मुख्य नोंदणी प्रमुख व त्याखाली सभासद नोंदणी अशा पध्दतीने डिजिटल सभासद नोंदणी अभियान मतदारसंघात चालू आहे.

या दौर्‍याच्या माध्यमातून डिजिटल सभासद नोंदणी अभियाना बरोबरच जनतेच्या अडी अडचणी जाणवून घेण्यात येत आहे. या अभियानात काँग्रेसचे ज्येेष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, पंचायत समिती सदस्य विजय शिंदे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, चिटणीस अ‍ॅड समीन बागवान, अ‍ॅड. विलास थोरात तसेच गावपातळीवरील पदाधिकारी मदत करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या