Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीपाद छिंदमचा निवडणूक स्थगितीचा अर्ज नामंजूर

श्रीपाद छिंदमचा निवडणूक स्थगितीचा अर्ज नामंजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. त्याच्या रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीला स्थगिती मिळावी यासाठी छिंदम याने केलेला अर्ज वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश अविनाश कुलकर्णी यांनी फेटाळला आहे.

- Advertisement -

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी छिंदम याला उपमहापौर पदावरून बडतर्फ केले होते. त्यानंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत छिंदम याने प्रभाग क्रमांक नऊ (क) मधून निवडणूक लढविली होती. यानंतर पुन्हा 27 फेब्रुवारी 2020 रोजी छिंदम याचे नगरसेवक पद रद्द केले होते. या रिक्त जागेवरील निवडणूक सध्या सरू आहे.

छिंदम याने अहमदनगर येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल करून नगरसेवक पद रद्दचा निर्णय स्थगित करावा तसेच निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.राज्य शासनाच्यावतीने अ‍ॅड. अनिल ढगे आणि महापालिका प्रशासनाच्यावतीने अ‍ॅड. महेश शरद काळे यांनी काम पाहिले. न्यायालयाने छिंदम याच्या दोन्ही मागण्या फेटाळल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या