Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशस्वाध्याय परिवाराचे डॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

स्वाध्याय परिवाराचे डॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

ठाणे –

स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांचे जावई आणि स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर (दीदी) यांचे

- Advertisement -

यजमान डॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (18 जानेवारी) अहमदाबाद येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी ठाण्यातील तत्वज्ञान विद्यापीठात अंत्यसंस्कार करण्यात आले. करोनामुळे कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वाध्याय परिवाराने घरूनच सायंकाळी 5 ते 7 यावेळात श्रीमद्भगवद्गीतेच्या 9,12,15,16 अध्यायाचे पारायण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

माटुंगा येथील हिंदू कॉलनीत त्यांचे निवासस्थान होते. अहमदाबाद येथे कामानिमित्त गेले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारसाठी मंगळवारी तत्वज्ञान विद्यापीठात आणण्यात आले. त्यांच्या निधनाने स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे.

हिंदू कॉलनीतील तळवलकर इस्पितळाचे तसेच रहेजा इस्पितळाचे संस्थापक सदस्य असलेले ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ कै. डॉ. नीळकंठ तळवलकर यांचे रावसाहेब तळवलकर हे सुपुत्र होते. तळवलकर यांचे कुटुंब म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे कुटुंब आहे. तळवलकरांच्या सलग सात पिढ्या कुठलाही खंड न पडता वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत राहिल्या आहेत.

डॉ. श्रीनिवास हे प्रिटिंग व्यवसायातही कार्यरत होते. स्वाध्याय परिवाराचे वैश्विक कार्य सांभाळणार्‍या धनश्री दीदींना त्यांनी मोलाची आणि खंबीर साथ दिली. स्वाध्याय परिवारात ते आदरणीय आणि लाडके व्यक्तीमत्व होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या