Friday, April 26, 2024
Homeनाशिकहरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे...

हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त (Shrikrishna Janmashtami) भक्तांनी उपवास करुन जन्मष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. करोनामुळे (Corona) मंदिरे बंद असली तर घराघरात जन्मोत्सव साजरा करुन उत्सवावर तुसभरही विरजन पडणार नाही याच दक्षता घेतली…

- Advertisement -

आज अनेकांच्या घरात दिवसभर श्रीकृष्णाचे पूजन झाले. श्री कृष्णाची ५२४७ वी जन्माष्टमी साजरी झाली. घरे आणि मंदिरे विशेष सजविण्यात आली होती. धर्मग्रंथांनुसार यावेळी गोकुळाष्टमीच्या दिवशी तोच संयोग घडला जो द्वापार युगात श्री कृष्णाच्या जन्माच्या दिवशी होता.

गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक शुभ योगायोग जुळून आले. गोकुळाष्टमीला जयंती आणि रोहिणी नक्षत्र योग होता. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी २९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११.२५ वाजता सुरु झाली जी ३० ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत राहिली.

गोकुळाष्टमीच्या पूजेसाठी शुभ वेळ सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४४ पर्यंत होती. श्रीकृष्णाची बालस्वरुपाची पूजा केली. रात्री पंचामृताने श्रीकृष्णाच्या मुर्तीवर अभिषेक नंतर नवीन कपडे, मोराचा मुकुट, बासरी, चंदन, वैजयंती माळ, तुळस, फळे, फुले, सुका मेवा, धूप, दिवा अत्तर इत्यादी श्रीकृष्णाला अर्पण करण्याचे कार्यक्रम झाले.

नाशिकच्या मुरलीधऱ मंदिरात तसेच भाक्तीधाममध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोपाळचा पाळणा हलवून लोणी, मिश्री किंवा धण्याच्या पंजिरीचा नैवेद्य अर्पण करुन प्रसाद वाटपाचा समारोप करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या