Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीगोंद्यात 114 पॉझिटिव्ह रुग्ण

श्रीगोंद्यात 114 पॉझिटिव्ह रुग्ण

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यात (Shrigonda Taluka) गुरुवारी (दि.19) नव्याने 114 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह (Covid 19 Positive) आले. दिवसभरात घेतलेल्या 530 रॅपिड अँटीजेन (Rapid Positive) चाचण्यांत 21 जण संक्रमित आढळले तर नगर (Nagar) येथून आलेल्या अहवालात 93 व्यक्ती पॉझिटिव्ह (Positive) असल्याचे निदान झाले. यात 44 स्त्री व 70 पुरुष रुग्णांचा सामावेश आहे. 413 संशयित रुग्णांचे घशातील नमुने घेऊन नगर येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुक्यात (Shrigonda) आत्तापर्यंत एकूण बधितांची संख्या 15,187 झाली आहे. तर एकूण 221 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे.सद्यस्थितीला 312 सक्रिय रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. शासकीय कोविड केंद्रात 58, गाव पातळीवरील कोविड केंद्रात 34, ग्रामीण रुग्णालयात 9 व खाजगी हॉस्पिटलमध्ये 211 जण उपचार घेत आहेत.

गुरूवारी श्रीगोंदा शहरात 17 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या तर तालुक्यातील ग्रामीण भागात आढळगाव 4, अजनुज 4, बेलवंडी बुद्रुक 15, बोरी 1, चांभुर्डी 1, चांडगाव 1, चिखलठाणवाडी 1, चिंभळा 1, चोराचीवाडी 1, एरंडोली 1, गार 1, घारगाव 2, घोटवी 1, हंगेवाडी 4, हिरडगाव 2, हिंगणी 1, कणसेवाडी 1, काष्टी 2, कौठा 3, खरातवाडी 3, कोकणगाव 2, कोळगाव 5, कोसेगव्हाण 1, लोणी व्यंकनाथ 2, मढेवडगाव 6, माठ 1, म्हातारपिंप्री 3, पारगाव सुद्रीक 5, पिसोरे बुद्रुक 2, पिंपळगाव पिसा 1, रायगव्हाण 2, सांगवी दुमाला 1, शेडगाव 1, राजापूर 1, टाकळी लोणार 1, तांदळी दुमाला 3, वांगदरी 3, वडगाव शिंदोडी 1, येळपणे 3, पेडगाव 2 व भावडी येथे 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या