Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंदा कारखाना संचालक, कामगारांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करा

श्रीगोंदा कारखाना संचालक, कामगारांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील नागवडे (श्रीगोंदा) सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना निवडणूक प्रचारास जुंपले असल्याने कारखान्याच्या पदाधिकारी, संचालक व कामगार यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केली आहे.

- Advertisement -

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, तालुका-श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना या संस्थेची निवडणूक लागलेली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मधील कलम 73 कब व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मधील नियम 3 परिपत्रकानुसार, सहकारी संस्थांची निवडणूक घोषित झाली आहे, त्या सहकारी संस्थेचे सेवक आपले दैनंदिन कामकाज सुरू ठेवतील. तथापी संस्थेचा कोणताही सेवक, त्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेणार नाही. सहकारी संस्थेच्या सेवकाने निवडणुकीमध्ये व प्रचारामध्ये कोणत्याही उमेदवारासाठी अथवा पॅनेलसाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये. असा आदेश असताना देखिल श्रीगोंदा साखर कारखान्यातील कर्मचारी तसेच कारखाना अंतर्गत असलेल्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी प्रचारामध्ये शिवाजीराव नागवडे किसान क्रांती पॅनेलचा प्रचार करत आहेत.

हा आचार संहितेचा भंग आहे. तरी त्यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात यावा. तसेच विश्रामगृहाच्या वापराबाबत आचारसंहिता परिपत्रकानुसार संस्थेच्या संचालक मंडळाने आचारसंहिता कालावधीत आचारसंहिता लागू असलेल्या कार्यक्षेत्रात अथवा कार्यक्षेत्राबाहेर संस्थेच्या खर्चाने दौरे करू नयेत, संस्थेच्या विश्रामगृहाचा वापर संचालकास,उमेदवारास अथवा इतर कोणासही आचारसंहिता कालवधीत करता येणार नाही. तसेच सहकारी संस्थेची वाहने व कर्मचारीवर्ग यांचा निवडणुकीच्या कामकाजासाठी विद्यमान पदाधिकारी व संचालकांनी कोणत्याही परिस्थितीत वापर करू नये या नियमाचेही विद्यमान पदाधिकारी व संचालक यांचेकडून सर्रास उल्लंघन होत आहे.

ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ चौकशी करून आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे संदीप नागवडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार यांचेकडे केली आहे. तसेच कारवाई न केल्यास सर्व पुरावे कोर्टात सादर केले जातील. यामध्ये कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या गेल्यास त्यास सर्वस्वी कामगार व शिक्षण संस्थेतील सेवकच जबाबदार राहतील, असा इशारा नागवडे यांनी दिला आहे.

अधिकार्‍यांनी शहानिशा करावी

संस्थेच्या कोणत्याही कर्मचार्‍यांना निवडणूक कामाला लावले नाही. कोणते पदाधिकारी गेस्ट हाऊसमध्ये बसतात, कोण उठतात, तिथं काय चालतं याची निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष शहानिशा करावी, अशी प्रतिक्रिया नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या