Tuesday, April 23, 2024
Homeनगरश्रीगोंदा पोलीस ठाणे आवारातच मारहाणीचा प्रकार

श्रीगोंदा पोलीस ठाणे आवारातच मारहाणीचा प्रकार

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहरातील महाविद्यालयाजवळ दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन सुरू झालेला वाद वाढत जाऊन सायंकाळी थेट पोलीस स्टेशनला पोहचला. राजकीय नेते पदाधिकार्‍यांनी समझोत्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गट आक्रमक असल्याने पोलीस स्टेशनमध्ये ही वाद मिटला नाही. एक गटांच्या काही जणांनी दोन जणांना पोलीस स्टेशनच्या आवारात बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला.

- Advertisement -

किरकोळ कारणातून सुरू झालेला वाद पोलीस स्टेशनला आला. त्यात राजकीय नेते, नगरसेवक यांनी मध्यस्ती करत सायंकाळी बैठक घेऊन हा वाद मिटवण्याचे ठरविले. यांनतर पोलिसांनी जमाव पांगवला. राजकीय नेत्यांनी व नगरसेवकांनी वाद झालेल्या दोघांनाही समोरं बसवून वाद मिटविण्याचे ठरविले. त्यासाठी दोन्हीं गटाच्या लोकांना समोरं बोलवण्यात आले मात्र त्याच ठिकाणीं फज्जा उडाला.

दुसर्‍या गटाचे लोकं बाहेर आल्याचे समजताच उस्फुर्त युवकांनी दोघांना पोलीस ठाण्यासमोरील सेतुत नेऊन बेदम मारहाण केली. त्यात ते गंभिर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदे या ठिकाणीं दाखल करण्यात आले असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.

पोलीस ठाण्यासमोरं झालेल्या या वादामुळे युवा राजकीय कार्यकर्ते, नेते यांचे कुणी ऐकत नसल्याच चित्र पहावयास मिळाले. याबाबत दोन्ही गटाचे कोणीही फिर्याद देण्यास तयार नव्हते.त्यामुळे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी याबाबत पोलीस कर्मचारी फिर्यादी होतील असे सांगत जर कुणी कायदा हातात घेत असेल तर सोडणार नाही असे सांगितले. मात्र दोन्हीं गटात वाद झाल्यानंतर दोन्हीं गटाच्या वेगवेगळ्या ठिकाण उशिरपर्यंत बैठका घेऊन चर्चा सुरू होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या