Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीगोंदा नगरपालिकेच्या कचर्‍यातही लाखोंचा गफला

श्रीगोंदा नगरपालिकेच्या कचर्‍यातही लाखोंचा गफला

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

नगरपालिकेच्या मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 साठी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 अन्वये

- Advertisement -

श्रीगोंदा शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍याचे ओला, सुका वर्गीकरणानुसार संकलन करून वाहतूक करणे या कामाकरिता ईबी एनव्हायरो बायोटेक प्रा. ली., नाशिक यांची नेमणूक केलेली आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. वेगवेगळ्या कामावर होणारा खर्च अधिक दाखवून बिले काढली जात असल्याची तक्रार संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

घनकचर्‍याचे वजन करणे करारानुसार बंधनकारक आहे; परंतु ठेकेदार फक्त 1 किंवा 2 दिवसांचेच वजन करून बाकीच्या दिवसाचे सरासरी वजन बेकायदा पद्धतीने स्वतःच्या मनाप्रमाणे व ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे गृहीत धरून नगरपरिषदेने बिले अदासुद्धा केली.

श्रीगोंदा शहरातील कचरा संकलन करताना कचरा ओला व सुका गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना घंटा गाडीमध्ये सर्व कचरा हा वेगळा न करता एकत्र भरला जातो. मार्च महिन्यापासून पूर्ण लॉकडाऊनमध्ये व्यापारी बाजारपेठा 100 टक्के बंद होत्या. तरीसुद्धा बंदच्या काळातले कचर्‍याचे वजन हे बाजारपेठ चालू असताना पेक्षा जास्त दाखविले आहे. आणि नगरपालिका प्रशासनाने नाममात्र वजन कमी करून बिल दिले आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत श्रीगोंदा शहरातील रस्त्यावरील कचरा व बांधकाम राडारोडा संकलीत करून वाहून नेण्याकामी लाखो रुपयांची बिले नगरपालिकेने अदा केली. मध्यंतरी बांधकामे बंद होती. रस्ते आजसुद्धा झाडली जात नाहीत रस्त्यावर पावसामुळे आलेला राडारोडा उचला जात नाही. नगरपालिकेने गाडीवर जी. पी. एस. यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक असतानासुध्दा जाणिवपूर्वक ती यंत्रणा बसवली नाही आणि ती बसवावी म्हणून वेळोवेळी मागणी केली.

तरी प्रशासन ठेकेदाराच्या बाजूने उत्तरे देतात घनकचरा ठेकेदाराला ठरवून दिलेल्या मार्गाप्रमाणे व वेळेनुसार कचरा संकलीत करणे बंधनकारक असताना तसे घडत नाही. मृत जनावरे उचलयाचे दर्शीवले आहे. याबाबत कुठले जनावर उचलले. याचा लेखी तपशील उपलब्ध नाही. सार्वजनिक शौचालय रोजच्या रोज सफाई केलेले नाहीत.

संपूर्ण शहरात प्रत्येक महिन्याला घनकचरा ठेकेदाराने स्वतःफोगिंग व जंतूनाशक, तणनाशक यांची फवारणी केलेली नसूनसुद्धा केले असे दर्शवून खोटी बिले वसूल केलेली आहेत वस्तुतः पावसाळ्यात फोगिंग करावे, अशी मागणी नागरिकांनी करून मशीन नादुरुस्त आहे, फवारणी केली नाही. घनकचरा ठेकेदाराच्या अधिपत्याखालील कर्मचार्‍यांना, कामगारांना हातमोजे, बूट सुरक्षा मास्क रेनकोट गणवेश पुरविले नसल्यामुळे कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात आहे, असेही संभाजी बिग्रेडच्या कार्यकत्यांनी सांगितले.

आधीही आक्षेप

2017-18 च्या लेखा परीक्षणात याच कंपनीवर व नगरपरिषदेवर अनेक गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. नगरपालिकेकडे 17 सफाई कर्मचारी, 2 मुकादम कार्यरत आहेत. एवढे पुरेसे मनुष्यबळ असताना नागरी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार पद्धतीने कचरा उचलणे ठेका दिल्याने सफाई कामगारांना वेतन, भत्ते व ठेकेदाराचे देयके असा दुहेरी खर्च झाल्याने नगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. खासगी ठेकेदाराला मोठ्या रकमेचा ठेका दिल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. सदर ठेका रद्द होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे सतीश बोरुडे आणि जिल्ह्याध्यक्ष टिळक भोस यांनी तक्रारीत म्हटले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या