Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंदा बाजार समितीचे सचिवावर शास्तीची कारवाई कायम

श्रीगोंदा बाजार समितीचे सचिवावर शास्तीची कारवाई कायम

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी संचालक मंडळाच्या परस्पर आपला पगार वाढवला होता.

- Advertisement -

याबाबत संचालक उमेश पोटे यांनी तक्रार केल्या नंतर जिल्हा उपनिबंधक यांच्या चौकशीत सचिव दिलीप डेबरे हे दोषी आढळले असल्याने त्यांच्यावर शास्तीची कारवाई चे आदेश देण्यात आले होते.

या आदेशा विरोधात डेबरे यांनी पणन संचालक यांच्याकडे अपील केले होते. हे अपील फेटाळण्यात आले असून बाजार समितीचे संचालकांच्या चौकशी समितीचा अहवाल एक महिन्यात देण्याचे पणन संचालक यांच्या आदेशात म्हंटले आहे.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्या परवानगी शिवाय पगार वाढ केल्याची तक्रार बाजार समितीचे संचालक उमेश पोटे यांनी केली होती याबाबत निर्णय देताना जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी बाजार समिती सचिव दिलीप डेबरे यांनी केलेले संस्थेचे नुकसान व्याजासह भरण्याचे तसेच त्यांच्या विरोधात शास्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी संचालक मंडळाचा अस्थिर कारभाराचा फायदा घेत आपला पगार जिल्हा उपनिबंधक यांची परवानगी न घेता संचालक मंडळाच्या ऐनवेळी च्या ठरावात नोंद करून परस्पर पगार वाढवला त्याला सहकार खात्याची मान्यता घेतली नसल्याने याची तक्रार संचालक उमेश पोटे यांनी केली होती.

बाजार समितीला सोसावे लागलेले आर्थीक नुकसान व्याजासह .दिलीप डेबरे , सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोदा यांचेकडून एकरक्कमी वसुल करावे तसेच दिलीप डेबरे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा यांचे विरुध्द महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १ ९ ६३ व नियम १ ९ ६७ तसेच मंजुर उपविधी व सेवानियमातील तरतुदीनुसार शास्तीची कारवाई करावी वरील १ व २ बाबतच्या निर्देशाचा अनुपालन अहवाल ३० दिवसाचे आत या कार्यालयास सादर करावा.

अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोदा बाजार समितीच्या समिती सदस्या विरुध्द पुढील उचित ती कार्यवाही केली जाईल असे जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशात म्हंटले होते.

या विरोधात पणन संचालक यांच्याकडे सचिव दिलीप डेबरे यांनी अपील केले होते.या अपिलाची सुनावणी करताना पणन संचालक सतिष सोनी यांनी सचिव यांचे अपील अमान्य करत अगोदर दिलेले आदेश कायम ठेवले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या