Thursday, April 25, 2024
Homeनगरश्री संत गंगागिरी महाराज पालखी व दिंडीचे श्रीरामपूर शहरात जल्लोषात स्वागत

श्री संत गंगागिरी महाराज पालखी व दिंडीचे श्रीरामपूर शहरात जल्लोषात स्वागत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गुरुवर्य गंगागिरी महाराज यांच्या प्रेरणेने, गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र सराला बेट ते पंढरपूर पायदिंडीचे काल श्रीरामपूर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. काल विठ्ठल हरिनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत होवून पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. टाळ-मृदुंगाचा गजर व पंढरीनाथ महाराज की जय, गंगागिरी महाराज की जय, जय हरी विठ्ठल या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

- Advertisement -

श्रीक्षेत्र सराला बेट ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करून प्रारंभ करण्यात आला. दिंडीत यंदा 1000 च्या वर भाविक सहभागी झाले होते. वारकरी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन दिंडीत सहभागी झाले होते. सराला बेट, उंदिरगाव, हरेगाव मार्गे या दिंडीचे श्रीरामपूर शहरात आगमन झाले. चौका-चौकात या दिंडीचे स्वागत करण्यात येवून वारकर्‍यांना खाद्यपदार्थाचे पाकिटे, तसेच विविध वस्तु भेट म्हणून देण्यात येत होते. ठिकठिकाणी फटाक्यांची अतिषबाजी करत फुलांची उधळण करत दिंडीचे स्वागत करण्यात येत होते.

सरालाबेट येथून बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणार्‍या पायी पालखी व दिंडीचे तसेच पालखीसह महंत रामगिरी महाराजांचे शहरात आगमन होताच उड्डाणपुलाजवळ आ. लहू कानडे, पंचायत समितीच्या माजीसभापती डॉ.वंदना मुरकुटे, अशोक कानडे, अरुण पा. नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी स्वागत केले. जनता विद्यालयसमोर साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, कैलास दुबैय्या, दत्तात्रय सानप, संजय फंड, दिलीप दिलीप नागरे यांनी स्वागत केले. रेल्वे स्टेशनसमोर सूर्यकांत अग्रवाल, योगेश गुप्ता, बंटी गुरुवाडा, अमित कोठारी, विष्णू लबडे, प्रताप देवरे, सुभाष तोरणे, अगस्ती त्रिभुवन, प्रेस क्लब श्रीरामपूरचे अध्यक्ष बाळासाहेब भांड आदींनी स्वागत केले. श्रीराम मंदिर चौकात भाजपाचे प्रकाश चित्ते, किरण लुणिया, गणेश भिसे, संजय यादव, सोमनाथ कदम, मनोज हिरवाळे, अर्जुन करपे, राजू पाटणी आदींनी पालखीचे स्वागत केले.

आझाद मैदानासमोर शिर्डी संस्थानचे विश्वस्त अनुराधा आदिक यांनी महाराजांचे औक्षण करून दिडींचे स्वागत केले. यावेळी अर्चना पानसरे, प्रियंका जनवेजा, सोनल मुथा, हंसराज आदिक, सुनील साठे, ताराचंद रणदिवे, राजेंद्र पवार, अर्जुन आदिक, आदित्य आदिक, सागर कुर्‍हाडे आदी उपस्थित होते. भगतसिंग चौकात ‘नाना’ज चहाच्यावतीने माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, जनार्दन नागले, करण ससाणे, निलेश नागले, दिपाली ससाणे, नितीन नागले आदींनी दिडींचे स्वागत केले. दिंडीचा मुक्काम उत्सव मंगल कार्यलयात होता. यावेळी उद्योजक नारायण डावखर, इंदुमती डावखर, रोहन डावखर आदींनी महाराजांचे स्वागत केले. मधु महाराज यांनी दिंडीचे व्यवस्थापन केले. श्रीरामपूर येथील रामगिरी महाराज मित्रमंडळाचे रावसाहेब उर्फ बबन तोडमल, अ‍ॅड. प्रसन्न बिगी, सचिन कुर्‍हाडे, राजेंद्र जर्‍हाड, भवार यांनी पुष्पहार घालून महंत रामगिरी महाराजांचे स्वागत केले.

दिंडीचे अशोक टॉकीज मार्गे थत्ते मैदानावर शिस्तबध्द पध्दतीने हरिनामाचा जयघोष करत आगमन झाले. या ठिकाणी वारकरी, टाळकरी यांनी रिंगण करत पावली खेळत हरिनामाचा जयघोष केला. तसेच हरिचा अश्व मैदानात दौड करत त्याचे दर्शन घेण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

या ठिकाणी विठ्ठलाची आरती करुन ही दिंडी नारायणराव डावखर यांच्या उत्सव मंगल कार्यालयात एकत्रित झाले. या ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर गुजराणी परिवार व लबडे परिवाराच्यावतीने महाप्रसादही देण्यात आला. आज रविवारी सकाळी 6 वाजता या दिंडीचे श्रीरामपूरवरुन बेलापूरकडे प्रस्थान केले जाणार आहे.

24 जून रोजी प्रस्थान झालेली दिंडीचे विविध ठिकाणच्या मुक्कामानंतर पंढरपूरमध्ये 11 जुलै रोजी दाखल होईल. त्यानंतर महाराजांच्या कीर्तनाने या दिंडीचा समारोप होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या