साई संस्थानने बुंदीप्रसाद सुरू करावा – गणेश कोते

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा विश्वस्त मंडळाच्या (Shri Sai Baba Board of Trustees) वतीने समाधी दर्शनानंतर (Samadhi Darshan) भाविकांना (Devotee) देण्यात येणारा बुंदीप्रसाद (Bundi Prasad) सुरू करण्यात यावा, अशी मागणी शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश दिनकर कोते (Ganesh Kote) यांनी केली आहे.

गणेश कोते यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय साई संस्थानच्या (Sai Institute) माध्यमातून साईभक्तांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा (Service Facility) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे महान कार्य साईसंस्थान विश्वस्त मंडळ तसेच संस्थान प्रशासन करत आहे. मागील दोन वर्षे करोनामुळे साईमंदीर (Sai Temple) दोनवेळा बंद करण्यात आले होते. संस्थानने प्रसादालय, नाश्ता पाकीटे, दर्शनरांगेत चहा बिस्कीट, बुंदीप्रसाद पाकिट इत्यादी सेवा भाविकांसाठी बंद केल्या होत्या. परंतु कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने संस्थानने नियमांमध्ये शिथिलता केली आहे.

त्यामुळे साई प्रसादालय, नाश्ता पाकिटे सुरू केले आहे. भक्तांना दर्शनासाठी देखील मर्यादा न ठेवता पुर्वीप्रमाणेच खुले करून दिले आहे. तसेच गुरुवारची पालखी सेवा सुरू केली आहे. साईमंदीराचे (Sai Baba Temple) जवळपास सर्वच प्रवेशद्वार भक्तांना येण्याजाण्यासाठी खुले केले आहे. शिर्डी ग्रामस्थ (Shirdi Villagers) आणि विश्वस्त मंडळ तसेच प्रशासन सध्या भाविकांना सेवासुविधा देण्यासाठी प्रभावीपणे काम करत आहे. याबाबत संस्थानचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दर्शन रांगेतून मंदिर बाहेर येणार्‍या भाविकांना दिला जाणारा बुंदीप्रसाद पाकिटे (Bundi prasad Pocket) सुरू करण्यात यावा, अशी मागणी भाविकांची आहे. त्यामुळे साईसंस्थानने तातडीने याविषयी निर्णय घेऊन भक्तांना बुंदीप्रसाद द्यावा, अशी मागणी गणेश कोते (Ganesh Kote) यांनी केली असून विश्वस्त तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (CEO Bhagyashree Banayat) याबाबत सकारात्मक विचार करतील, असा विश्वास व्यक्त केला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *