दहीहंडी फोडून साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थान (Shri Sai Baba Trust) विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्यावतीने दिनांक 14 ऑक्टोबर पासून सुरु असलेल्या श्रींची पुण्यतिथी उत्सवाची (Punyatithi Utsav) सांगता रविवारी काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली.

उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे 4.30 वाजता काकड आरती, त्यानंतर पहाटे 5.05 वाजता श्रींचे मंगल स्नान व शिर्डी (Shirdi) माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी 6 वाजता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (Chief Executive Officer Bhagyashree Banayat) व त्यांचे पती संजय धिवरे, सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नाशिक यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. सकाळी 10 वाजता मंदिर पुजारी उल्हास वाळुंजकर यांचे गोपाळ काल्याचे कीर्तन झाले.

काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात (Samadhi Temple) उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नाशिक संजय धिवरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी 6.15 वाजता श्रींची धुपारती तर रात्रौ 10.30 वाजता शेजारती झाली.

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेला प्रतिकात्मक भिक्षा झोळीत ग्रामस्थ व साईभक्तांनी भरभरुन दान दिले. यामध्ये गहु, तांदुळ, बाजरी, ज्वारी, तुरदाळ व हरभरादाळ असे सुमारे 150 पोते धान्यरुपाने आणि रवा, गुळ, साखर व खाद्य तेल आदींव्दारे 3 लाख 38 हजार 266 रुपये व रोख स्वरुपात रुपये 1 लाख 26 हजार 708 रुपये तर शॉल बेडशीट आदी वस्त्रांव्दारे 997 रुपये अशी एकुण 4 लाख 65 हजार 971 रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीव्दारे प्राप्त झाली.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *