Wednesday, April 24, 2024
Homeनगरसाईबाबांच्या चरणी हैद्राबाद येथील साईभक्ताकडून 4 किलो सोने दान

साईबाबांच्या चरणी हैद्राबाद येथील साईभक्ताकडून 4 किलो सोने दान

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

संपूर्ण विश्वाला सबका मालीक एक संदेश देणार्‍या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी हैदराबाद येथील पार्थ रेड्डी या साईभक्तांने 4 किलो वजनाचे तब्बल 2 कोटीपेक्षा जास्त रुपयांचे सोने साईचरणी दान दिले असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान सोमवार दि.16 रोजी हैदराबाद येथील साईभक्त पार्थ रेड्डी यांनी 4 किलो सोने साईचरणी दान केले. यावेळी श्री रेड्डी यांचा साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी सत्कार केला. यावेळी साईमंदीर प्रमुख रमेश चौधरी, श्री तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. दक्षिण भारतातील साईभक्त के.व्हि रमणी यांनी साईबाबा संस्थानला शंभर कोटी रुपये दान दिले. तर आर.रेड्डी यांनी सोन्याचा सिंहासन दान दिला त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दान करणारे पार्थ रेड्डी हे तिसरे दक्षिण भारतीय साईभक्त ठरले आहे.

शिर्डी येथील श्री साईबाबा मंदीर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनले असून देशविदेशातून भाविक मोठ्या प्रमाणावर दान करतात. त्यामुळे देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान म्हणून नावारूपाला आले आहे. साईबाबा संस्थानच्या खजाण्यात साधारणपणे अडीच हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून या व्यतिरिक्त पाचशे किलोपेक्षा जास्त सोने तसेच चांदी मोठ्या प्रमाणात दान आले आहे. दिवसेंदिवस साईबाबांच्या दानात भाविकांकडून भर पडत आहे.

हैद्राबाद येथील हेक्ट्रॉ कंपनीचे चेअरमन पार्थ सारथी रेड्डी या साईभक्ताने 2016 पासून साईसंस्थान विश्वस्त व्यवस्थेची परवानगी घेऊन साईबाबांच्या मुर्तीच्या पादुकाखालील भागास पारंपरिक पद्धतीने नक्षीदार डिझाईन केलेले 4 किलो वजनाचे सुमारे 2 कोटी रुपयापेक्षा जास्त किंमतीचे सोने साईंबाबांच्या चरणी अर्पन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या