Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपुरात श्रीराम जन्मोत्सव साध्या पध्दतीने भक्ताविना साजरा

श्रीरामपुरात श्रीराम जन्मोत्सव साध्या पध्दतीने भक्ताविना साजरा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

कोवीड 19 साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जातो. याहीवर्षी गुरु प्रदीप वाडेकर यांच्या हस्ते पाळणा हलवून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्रीरामनवमी यात्रेनिमित्त दरवर्षी गर्दीने फुलणारे रस्ते यंदा ओस पडले होते.

- Advertisement -

श्रीराम नवमी उत्सव श्रीरामपूरकरांसाठी नेहमीच आकर्षणाचा असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोवीड-19 या साथीच्या आजाराने राज्यात लॉकडाऊन असल्याने हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही मे. पोपट भगीरथ महाले ज्वेलर्स यांच्यावतीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रीराम जन्मोत्सव श्रीरामपूरकरांनी अनुभवला. सुरुवातीला गुरु वाडेकर यांनी पारायणाचे वाचन केले. 12 वाजता मंत्रोपच्चाराच्या जयघोषात पाळणा म्हणून श्रीराम जन्मोत्ससव साजरा झाला. त्यानंतर आरती झाली. श्रीराम जन्मोत्सवनिमित्त बेलापूर येथील बबनराव जाधव यांनी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तर मंदिराच्या गाभार्‍यात अलिशा डेकोरेशनचे फिरोज शेख यांनी आकर्षक फुलांची सजावट विनामूल्य केली होती.

रेल्वे स्टेशन हनुमान मंदिराच्यावतीने पंजेरी नैवैद्य देण्यात आला. मंदिराच्या विश्‍वस्त समितीच्या अध्यक्षा श्रीमती प्रणिता राजन गिरमे व सेक्रेटरी दिनेश सूर्यवंशी, रोनक राजन गिरमे, अनिल रामचंद्र गिरमे, रमेश मधुकर झिरंगे, अशोक शिवदास फोफळे, वृषाली मिलिंद गिरमे, प्रतिक सुधीर बोरावके, अमोल प्रकाश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी गुरु पदीप वाडेकर गुरु यांनी मंत्रोच्चारत विधीवत पूजन करुन महाआरती केली. प्रांताधिकारी अनिल पवार यांनी कोवीड-19 साथीच्या पार्श्‍वभूमीवर घालून दिलेले नियम व अटींचे पालन करत हा सोहळा पार पडला. शहरातील काळाराम मंदिरात तसेच साई मंदिरातही अत्यंत साध्या पध्दतीने रामजन्मोत्सव पार पडला.

दरवर्षी रामनवमीनिमित्त शिवाजी रोड, मेनरोड, थत्ते मैदान, बेलापूर रोड हा भाग नागरिकांनी भरलेला असत. तसेच रहाट पाळणे व खेळणीचा मजाच वेगळी होती. मात्र यावर्षी करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मंदिरे बंद करण्यात आली असून ठराविक लोकांच्या सहकार्याने मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येवून मंदिराच्या गाभार्‍यात तसेच मंदिरात फुलांची आरस करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या