देवळाली : यंदाही श्री म्हसोबा महाराज यात्रा रद्द

jalgaon-digital
1 Min Read

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik

करोनाचे (Corona) सावट अद्यापही संपलेले नसल्याने यावर्षीदेखील देवळाली (Deolali) गाव येथील ग्रामदैवत श्री मसोबा महाराज यात्रा (Shri Masoba Maharaj Yatra) रद्द करण्यात आली आहे…

देवळाली गाव येथील श्री म्हसोबा महाराज यात्रा दरवर्षी महाशिवरात्र (Mahashivaratra) झाल्यानंतर आठ दिवसांनी भरते. ही यात्रा तीन दिवस सुरू असते. या दिवसात पंचक्रोशीतून लाखो भाविक श्री म्हसोबा महाराजांच्या दर्शनासाठी येतात.

परंतु गेल्या दोन वर्षापासून करोनाचे (Corona) सावट असल्याने यात्रा यंदादेखील रद्द करण्यात आली आहे. गेल्यावर्षीही श्री म्हसोबा महाराजांची यात्रा रद्द करण्यात आली होती. यात्रा रद्द करण्यात आली असली तरी धार्मिक कार्यक्रम मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *