Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीक्षेत्र ताहाराबादला जमला वैष्णवांचा मेळा

श्रीक्षेत्र ताहाराबादला जमला वैष्णवांचा मेळा

ताहाराबाद |वार्ताहर| Taharabad

लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबादला काल रविवारी कामिका एकादशीचे औचित्य साधून लाखो भाविकांनी श्री संत कवी महिपती महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या. यावेळी सरत्या आषाढसरींनीही प्रतिपंढरी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र ताहाराबादला हजेरी लावली. आषाढसरीत न्हाऊन निघताना लाखो वारकर्‍यांनी टाळमृदुंगाच्या गजरात व ज्ञानोबा-तुकोबा आणि रामकृष्णहरीचा जयघोष करीत एकादशीची वारी केली. त्यामुळे काल प्रतिपंढरीत लाखो भाविकांची मांदियाळी जमली.

- Advertisement -

शेकडो पायी दिंड्यांचे नेवाशात आगमन

दि.22 जुलैपासून श्रीक्षेत्र ताहाराबादला ‘पांडुरंग महोत्सवा’ला प्रारंभ झाला आहे. काकडा भजन, महापूजा, महाभिषेक, आरती, नैवेद्य, नगर प्रदक्षिणा, हरिपाठ व रात्री कीर्तन यासारख्या धार्मिक सोहळ्याने व वारकर्‍यांच्या मांदियाळीने प्रतिपंढरी दणाणून गेले आहे. दि.28 जुलैपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. एकूण 7 लाखाहून अधिक भाविक प्रतिपंढरीत येतील, असा अंदाज व्यवस्थापनाने बांधला आहे. काल एकादशीच्या निमित्ताने दुपारी नाना महाराज गागरे यांचे कीर्तन पार पडले. जे वारकरी पंढरपूरला जात नाही, ते वारकरी श्रीक्षेत्र ताहाराबादची वारी करतात.

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

कालपासून प्रतिपंढरीच्या चोहोबाजूंनी महाराष्ट्रातून पायी दिंडी सोहळ्यांची पाऊले मार्गक्रमण करीत आहेत. काल व आज ताहाराबाद क्षेत्री शेकडो पायी दिंडी सोहळे दाखल होणार आहेत. सध्या प्रतिपंढरीत भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या वारकर्‍यांची तोबा गर्दी झाली असून हरिनामाच्या गजराने ताहाराबाद क्षेत्र दुमदुमून गेले आहे. तर भगव्या झेंड्यांमुळे प्रतिपंढरीला भगवा महापूर आला आहे.

पावसाचा जोर ओसरल्याने दारणाचे रॅडिअल गेट बंद

‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे प्रतीपंढरी’ अशी साद देत वारकर्‍यांनी काल पांडुरंग उत्सवाला हजेरी लावली. राज्यातून लाखो भाविकांचा ओघ ताहाराबादच्या पुण्यभूमीकडे सुरूच आहे. दिंड्यांमध्ये ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करत नाचत, फुगडी खेळत महिलांनी आनंद लुटला. एकादशीच्या पर्वणीत सकाळच्या सत्रात नाना महाराज गागरे, दुपारी सुधाकर महाराज आहेर तर रात्री एकनाथ महाराज चत्तर यांची कीर्तन सेवा झाली. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आगारांनीही जादा बसेसची व्यवस्था केली आहे. तर ताहाराबाद ग्रामस्थांनीही येथे येणार्‍या भाविकांची चोख व्यवस्था ठेवली आहे.

विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नीचा मृत्यू

आज सोमवार दि.25 जुलै रोजी काकडा भजन, पूजा कुळधर्म कार्यक्रम, पवमान अभिषेक, द्वादशी पारणं यासह सकाळी 10 वाजता रामदास महाराज क्षीरसागर, दु.4 वा. मनोहर महाराज सिनारे तर रात्री 8 वा. समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. एकादशीला अशोक केदारी (खेडले परमानंद), निवृत्ती हारदे, रावसाहेब गाडे व सुभाष मुंढे यांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या