Friday, April 26, 2024
Homeधुळेशिरपूर येथे श्री खंडोबा यात्रोत्सव रद्द

शिरपूर येथे श्री खंडोबा यात्रोत्सव रद्द

शिरपूर । प्रतिनिधी

शहरातील ग्रामदैवत व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सुरु केलेल्या 268 वर्षांची यात्रेची अखंड परंपरा लाभलेल्या श्री खंडेराव महाराज यांचा दि. 27 फेब्रुवारी माघ शुध्द पोर्णिमेपासून पासून होणारा यात्रोत्सव कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरवर्षी श्री खंडेराव बाबा विकास संस्थेतर्फे यात्रोत्सव आयोजित करण्यात येतो. यात्रोत्सवाची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. शिरपूर खंडेराव मंदिर हे शहरवासीयांचे ग्रामदैवत आहे. अनेक वर्षापासून भाविक सणावाराला या ग्रामदैवतास नारळ फोडण्याचा मान देतात. यात्रोत्सव साधारण पंधरा दिवस चालतो.

यात्रेस शिरपूर शहर व तालुक्यातील अबालवृद्ध, महिला, पुरुष, तरुण यात्रोत्सवाचा मनमुराद आनंद घेतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भाविक आपला नवस फेडण्यासाठी येतात. नवसाला पावणारा देव म्हणून श्रीखंडेरावाची ख्याती आहे. अनेक भाविकांनी या ठिकाणी नवस पूर्ण केलेले आहेत. वंशपरंपरेने आजपर्यंत मोरे कुटुंबीय मंदिराची पूजाअर्चा व देखरेख काळजी घेत आहेत.

स्व.दौलत रामा मोरे यांचे चिरंजीव माधवराव उत्तमराव, गोविंदराव व भानुदास मोरे या ठिकाणी आजही कार्यरत आहेत. तळी भरणे, खंडेरावाची पारंपरिक पूजा-अर्चा, अभिषेक व सर्व धार्मिक विधी मोरे परिवार सांभाळतात. मोरे परिवारासोबत श्री खंडेराव बाबा विकास संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ या सर्व सार्वजनिक कार्यात उत्साहाने सहभागी होतात. पूर्वीचे पुरातन मंदिर अत्यंत सुस्थितीत व कलाकौशल्याने उभारण्यात आलेले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर खंडोबा यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. दि. 27 फेब्रुवारी रोजी फक्त महाआरती, पूजाअर्चा करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या