Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्री गजानन महाराज साखर कारखाना देणार उसाला उच्चांकी भाव

श्री गजानन महाराज साखर कारखाना देणार उसाला उच्चांकी भाव

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील कौठे – मलकापूर येथिल पहिला खाजगी साखर कारखाना असलेल्या श्री गजानन महाराज साखर कारखान्याचा सहावा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू झाला असून 2022-23 या चालू गळीत हंगामात गाळप होणार्‍या उसासाठी प्रति मेट्रीक टन 2 हजार 313 रुपये दर दिला जाणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन रवींद्र बिरोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

- Advertisement -

श्री गजानन महाराज साखर कारखान्याने मागील पाच गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडले असून दरवर्षी उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न केला आहे. 2022-23 साठी कारखान्याची प्रति मेट्रीक टन एफआरपी 2 हजार 100 रुपये आहे. परंतु ऊस उत्पादक शेतकर्‍याचे हित डोळ्यासमोर ठेवून संगमनेर, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रति मेट्रीक टन 2 हजार 313 रुपये दर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतल्याचे रविंद्र बिरोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूकदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे कारखाना यावर्षी उच्चांकी दर देण्याबरोबरच विक्रमी गाळप करणार असल्याची ग्वाही देण्यात आली असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी वाहतूकदार यांच्या मदतीने कारखान्याला अग्रक्रमाने ऊस गाळपासाठी देण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन रवींद्र बिरोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या