Saturday, April 27, 2024
Homeजळगावश्रावण सोमवार # धारकुंड धार्मिक क्षेत्री भक्तगणाची गर्दी

श्रावण सोमवार # धारकुंड धार्मिक क्षेत्री भक्तगणाची गर्दी

सोयगाव Soygaon

सोयगाव तालुक्यातील बनोटी गावापासून (Banoti village) आठ किमी अंतरावर असलेल्या धारकुंड (Dharkund) हे महादेवाचे (Lord Mahadev) श्रद्धास्थान (place of worship) असुन ह्या क्षेत्रास धारेश्वर नावाने देखील ओळखले जात असुन ३०० फुटांवरून कोसळणारा धबधबा (cascading waterfall) येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र (Tourist attraction) बिंदू ठरत आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तगण घनदाट जंगलातून पायवाटेने येत असतात परंतु ह्या धार्मिक स्थळाचा अद्यापपर्यंत विकास (Development) झालेला नसून येथे जाण्यासाठी पर्यायी रस्ता देखील नसल्याने येणाऱ्या भक्तगणांचा हिरमोड होत असतो .

- Advertisement -

धारकुड धार्मिक क्षेत्र हे घनदाट जंगलात असुन दोन्ही बाजुने व्ही आकाराचा उंच डोंगर आहे येथे ३०० फुटांवरून कोसळणारा धबधबा येणाऱ्या भक्तगणांना अंघोळ करण्याचा मोह आवरता येत नाही. वरून येणारी धार खाली दगड मारल्यासारखी लागत असते येथे एक मोठे कुंड तयार झाले आहे. परंतु ह्या वर्षी परीसरात मोठा पाऊस न झाल्याने ही धार कमी प्रमाणात वाहत आहे. त्यामुळे परीसरातील तलाव देखील अद्यापपर्यंत भरलेले नाही. हिवरा नदीचा उगम ह्याच धारकु़ड क्षेत्रापासुन झालेला आहे. बाजुलाच एक मोठी कपार असुर त्यामध्ये महादेवाची मोठी पिंड आहे कपारमध्ये गेल्यास थंड वातावरणात निर्माण होते. येणारा प्रत्येक भक्तगण येथे दर्शन घेत असतो.

श्रावण महिन्यात नवस फेडण्यासाठी दुरदुरुन भक्तगण येत असतात. हर हर महादेवाची घोषणा करतात. तेव्हा हा आवाज दोन ते तीन वेळा त्याच ठीकाणी घुमत असतो. ह्या कपाराच्या वरती खडकांमध्ये पाच अप्रतिम कोरीव लेणी आहेत. परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. पुरातन विभागाने धार्मिक स्थळाचा विकास करावा व येणाऱ्या भक्तगणांसाठी पर्यायी रस्ता करावा अशी मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या