Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरशॉर्टसर्किटने डाळींब बाग जळून खाक; महावितरणकडून शेतकर्‍याला दंडाची नोटीस

शॉर्टसर्किटने डाळींब बाग जळून खाक; महावितरणकडून शेतकर्‍याला दंडाची नोटीस

करंजी |प्रतिनिधी|Karanji

अहमदनगर तालुक्यातील माथणी येथे शेतातून गेलेल्या महावितरणच्या विद्यूत तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगित लाखो रूपयांची डाळिंबाची बाग जळून राख झाल्याची घटना घडली. मात्र महावितरण विभागाने शेतकर्‍यालाच दंडाची नोटीस पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

भाऊसाहेब झुंबर ठोंबे (रा. माथणी, ता. अहमदनगर) यांच्या बागेला आग लागली. यामध्ये दोनशे डाळिंबाची झाडे जळून खाक होवून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असताना महावितरणने मात्र शेतकरी ठोंबे यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. ठोंबे चोरीची वीज वापरत असल्याचे आरोप करत महावितरणचे नुकसान झाले म्हणून तीस हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस त्यांना धाडली आहे.

या घटनेची माहिती अशी की 20 मार्च रोजी भाऊसाहेब ठोंबे यांच्या शेतातुन गेलेल्या महावितरणच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठोंबे यांच्या डाळिंब बागेला आग लागली. ही आग एवढी भयानक होतीकी या आगीमध्ये ठोंबे यांचे दोनशे डाळिंबाचे झाडे ठिबक पाईप देखील जळाले यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर ठोंबे यांनी 22 मार्च रोजी महावितरणच्या अधिकार्‍यांना या घटनेची माहिती दिली.

संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन डाळिंब बागेची पाहणी केली ठोंबे यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर पुढे काहीही कार्यवाही न करता तुम्ही चोरून वीज वापरता म्हणून ठोंबे यांनाच 30 हजार 780 रुपयांचा दंड भरण्याची नोटीस धाडली. माझ्याकडे शेतीपंपाचे अधिकृत वीज कनेक्शन आहे. त्यामुळे चोरून वीज वापरण्याचा प्रश्नच नाही मला नुकसान भरपाई देणे ऐवजी मलाच आरोपीचे पिंजर्‍यात उभे करण्याचे काम महावितरण केले असल्याचा आरोप करत ठोंबे यांनी महावितरण कार्यालयासमोर अमरण उपोषण बसण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या