Friday, April 26, 2024
Homeनगरदुकान फोडून 45 हजारांची रक्कम चोरली

दुकान फोडून 45 हजारांची रक्कम चोरली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तीन चोरट्यांनी किराणा दुकान फोडून गल्ल्यातील 45 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. सोमवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास वडगाव तांदळी (ता. नगर) शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुनील किसन रणसिंग (वय 48 रा. वडगाव तांदळी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे वडगाव तांदळी गावामध्ये राहत्याघरासमोर किराणा दुकान आहे. त्यांनी रविवारी रात्री किराणा दुकान बंद करून घेतले होते. सोमवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या किराणा दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. ड्रावरमध्ये ठेवलेली 45 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. किराणा दुकान फोडून रक्कम चोरीला गेल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार लबडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या