Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरकुकाण्यात दुकान गाळ्याच्या वादातून हाणामारी

कुकाण्यात दुकान गाळ्याच्या वादातून हाणामारी

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे दुकान गाळ्याच्या वादातून हाणामारीची घटना घडली असून याबाबत दाखल परस्परविरोधी फिर्यादींवरून दोन्ही बाजूच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत विजय पोपटलाल गांधी (वय 55) रा. मारुती मंदिराजवळ कुकाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महंमद कलिंदर इनामदार, रा. जेऊरहैबती, ता. नेवासा यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले की, 14 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या गाळ्याजवळ फिर्यादी हे त्यांच्या गाळ्याची साफसफाई करत असताना यातील आरोपी याने त्या ठिकाणी जाऊन हा गाळा माझा आहे, असे म्हणाला असता यातील फिर्यादी याने त्यास समजावून सांगितले.

त्याचा राग आल्याने त्याने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या डाव्या हातावर, डाव्या पोटरीवर मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 41/2023 भारतीय दंड विधान कलम 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे करत आहेत. दुसरी फिर्याद महंमद कलिंदर इनामदार (वय 55) रा. जेऊर हैबती ता. नेवासा यांनी दिली असून त्यावरून मनोज गांधी व बाळासाहेब गांधी (दोघांचेही पूर्ण नाव माहीत नाही) रा. कुकाणा ता. नेवासा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले की, 14 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या टपरीसमोर कुकाणा गाात मेनरोडवर फिर्यादी यांनी आरोपी यांना भाड्याने दिलेली टपरी मला धंद्याकरिता पुन्हा मला द्या, असे म्हणाले असता त्याचा त्यांना राग आल्याने बाळासाहेब गांधी याने त्याच्या हातातील काहीतरी धारदार हत्याराने उजव्या पायाच्या नडघीवर मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रज्हिटर 42/2023 भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणेगुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या