Saturday, April 27, 2024
Homeनाशिकवस्तू खरेदी दुकानातूनच करा!

वस्तू खरेदी दुकानातूनच करा!

नाशिक । प्रतिनिधी

टेलिव्हिजन, रेडिओ, संगणक, मोबाईल या आणि अशा असंख्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमुळे मानवी जीवन आनंददायक आणि आल्हाददायक बनले आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. इलेक्ट्रॉनिक्स विश्वाच्या दुनियेतील महत्वाचे आणि विश्वासू नाव म्हणजे मयोगेश इले्ट्रॉनिक्स..! जगातील नामवंत कंपन्यांचे टिव्ही, वॉशिंग मशीन, म्युझिक सिस्टिम, रेडीओ, मोबाईल व इतर बरेच होम अप्लायन्सेस मिळतात, येथे मिळतात.

- Advertisement -

साधारणतः 35 वर्षांपूर्वी सनी वाणी यांचे वडील दिवंगत योगेश वाणी यांनी मयोगेश इलेक्ट्रॉनिक्सफची स्थापना शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या एम. जी. रोड येथे केली. 10 वर्षांपासून गंगापूर रोड येथील जेहान सर्कलजवळ वडिलांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 15 वर्षांपूर्वी सनी वडिलांना या व्यवसायात मदत करीत. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांनी दुकानाची जबाबदारी स्वीकारली.

घरातील व्यवसायाभिमुख वातावरणामुळे लहानपणापासूनच त्यांना व्यवसायाची प्रेरणा मिळाली. काळासोबत व्यवसायात अनेक बदल घडत गेले. नवीन तंत्रज्ञान आले. नव्या पिढीला नेमके काय हवे ते ओळखून त्याप्रमाणे मागणीनुसार सनी यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा पुरवठा केला. मकरोनाफ महामारीमुळे काही महिन्यांपूर्वी लॉकडाऊन झाला.

तेव्हा सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजू लोकांना सनी यांनी मदातीचा हात दिला. रोख स्वरूपात असो वा किराणा अशा अनेक प्रकारची मदत त्यांनी केली. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, हे ओळखून सनी यांनी मकरोनाफकाळात दुकान बंद असतानासुद्धा आपल्या सेवकांचे वेतन सुरूच ठेवले होते.

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे, ऑनलाईनफमुळे व्यवसायाला फटका जरूर बसतो. मात्र यावरदेखील सनी यांनी तोडगा काढला. सनी यांच्या शॉपमधून होम डिलिव्हरी, अनेक वस्तूंना वॉरंटीचा कालावधी या व अन्य गोष्टींमुळे ग्राहक मऑफलाईन पद्धतीचा पर्याय स्वीकारत आहे. ऑनलाईन घेतलेल्या वस्तूंची विश्वासाहर्तादेखील ग्राहकांसाठी कळीचा मुद्दा आहे.

मधल्या काळात वडिलांच्या निधनानंतर व्यवसायातील पोकळी भरून काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना सनी यांना करावा लागला. मात्र न डगमगता त्यांनी यावर मात केली. व्यवसायाला मकरोनाफचा फटका बसल्यानंतरसुद्धा त्यांनी कौशल्याच्या जोरावर नव्याने उभारी घेतली आहे. सनी यांचे कार्यकर्तृत्व आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

अनेक ऑनलाइन कंपन्यांचा महसूल विदेशात जातो. जास्तीत जास्त लोकांनी दुकानातूनच वस्तू खरेदी केली पाहिजे. त्यामुळे आपल्या लोकांचा पैसा आपल्याच देशात राहील.

सनी वाणी, संचालक, योगेश इलेक्ट्रॉनिकस्

- Advertisment -

ताज्या बातम्या