भूकंप सदृश्य धक्क्यांनी मोखाडा पुन्हा हादरले

मोखाडा | माधुरी आहेर Mokhada

आज मोखाडा Mokhada येथे सकाळी सात ते सात साडेसातच्या दरम्यान भूकंप सदृश्य मोठा धक्का shooks similar as like Earthquake बसल्याचे जाणवले असून पिंपळाच्या पाड्या नजीक आनंदवाडीतील हौसा प्रल्हाद वाघ यांच्या घराला या धक्क्याने तडा गेला असुन भिंत पायापासून दुभंगली आहे.

भूकंप सदृश धक्क्याने तडा गेला असल्याचे वाघ कुटुंबीयांचे म्हणणे आहे.मात्र हे धक्के नेमके कसले आहेत हे तालुक्याच्या महसुल प्रशासनाकडून समजु शकलेले नाही.हौसा वाघ यांचे घर लाकडाच्या वखारीच्या मिलच्या बाजूला असून घर कच्चे असून मातीत वीटकाम केलेले आहे.तर तालुक्यापासून पाच ते सहा किलोमीटर दूर असलेल्या भेंडी चा पाडा येथील यमुना जाबर या महीलेनेही सकाळी जोरदार धक्का जाणवले असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे तालुक्यात काही प्रमाणात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी मोखाडा शहर व परीसरात असे धक्के जाणवत होते.दरम्यान हे धक्के कसले आहेत हे जाणून घेण्यासाठी मोखाडा तहसीलदार यांना फोन केला असता रेंज प्रॉब्लेम मुळे संपर्क होऊ शकलेला नाही.त्यामुळे हे धक्के नेमके कसले आहेत हे खात्रीलायक सांगता येत नाही.

मात्र हे भुकंपाचे धक्के असु शकतात असे भिंतीला तडा गेलेल्या हौसा वाघ यांचे म्हणणे आहे.महसुल विभागाने वरीष्ठ कार्यालयाला वास्तविक परीस्थिती कळविली असुन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शहानिशा करत आहे अशी अंदाजे माहीती मिळत आहे.महसूल विभागाला हौसा वाघ यांच्या तडा गेलेल्या घराची मिळताच RNT ठाकरे यांच्या आदेशानुसार तलाठी ठाकरे यांनी हौसा वाघ यांच्या घरी भेट देऊन तात्काळ पंचनामा केल्याने पंचक्रोशीतून समाधान व्यक्त केले जात आहे.दरम्यान भुकंप मापन यंत्रणा तालुक्यात उभी राहिल्यास हिताचे ठरेल.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *