Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशेतकऱ्यांचे शोलेस्टाईल आंदोलन

शेतकऱ्यांचे शोलेस्टाईल आंदोलन

सटाणा । प्रतिनिधी Satana

केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेला शेतकऱ्यांचा मका एनइएमएल पोर्टल बंद झाल्याचा हवाला देऊन फेडरेशनने खरेदी केलेला मका तीन महीण्यांनंतर शेतकऱ्यांना मका परत करण्याच्या निर्णया विरोधात पिडीत शेतकऱ्यांनी येथिल तहसील कचेरी समोरील नगरपालिकेच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन करून आपल्या मालाचे पैसे मिळावे यासाठी घोषना बाजी केली.

- Advertisement -

अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली. दुपारी ३ वाजता आंदोलन सुरू झाले. प्रशासनाच्या हमी नंतर सायंकाळी साडेसहा वाजता आंदोलकांनाखाली उतरविण्यात आले.

केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेअंतर्गत फेडरेशनच्या माध्यमातून सटाणा येथिल दक्षिण सहकारी सोसायटीमार्फत आधारभूत किमतीत मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी मका विक्री केला. मात्र शेवटच्या टप्यात ज्या शेतकऱ्यांनी माल विक्री केला त्यावेळेस पोर्टल बंद झाले होते.

याबाबत संबंधीत शेतकऱ्यांनी तहसिलदार जितेंद्र इंगळे यांची भेट घेऊन ऑफलाईन खरेदी सुरू करण्याची मागणी केली होती. तहसिलदार जितेंद्र इंगळे यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांची व्यथा मांडली खासदारांनी संबंधीत संस्थेशी संपर्क साधून मका खरेदी सुरू ठेवण्याची मागणी केली .

या बाबत केंद्र शासनाच्या संबंधीत विभाशीही चर्चा करूनही या शेतकऱ्यांचा माल परत करण्याचे आदेश फेडरेशनने दिल्याने संबंधीत शेतकऱ्यांनी आज दि. २१ रोजी दुपारी ३ वाजता पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन सुरू करून घोषना बाजी केली. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. पोलीस उपनिरीक्षक शिंदेसाहेब यांनी आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती केली मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.

या आंदोलनात शंकर नेरकर, पंकज शिरोडे,अरुन आहीरे,भुषण पाटील,भरत मांडवडे,तुकाराम शिरोडे,काळू काकुळते,समाधान खैरणार सहभागी झाले होते. यावेळी स्वाभिमानी शेसकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष अहीरे, प्रहार संघटनेचे गणेश काकुळते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या