Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामहिलांचे शोले स्टाईल आंदोलन

महिलांचे शोले स्टाईल आंदोलन

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी, घोटी तसेच ठाणे जिल्हयातील शहापूर शहराला आणि समृद्धी महामार्ग प्रकल्प (Samriddhi Highway Project) यांना भावली धरणाचे ( Bhavli Dam ) पाणी दिले जात आहे. मात्र याच भागातील मानवेढे आणि परिसरातील गावांना मात्र तहानलेले ठेवले जात आहे. यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी थेट भावली धरणावर जाऊन सर्व योजनांचा पाणीपुरवठा बंद पाडला.

- Advertisement -

जोपर्यंत मानवेढे ( Manvedhe )आणि परिसरातील गावांना पाणी दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. ह्यामध्ये पुरुषांनी सुद्धा मोठ्या संख्येने भाग घेतला आहे.

धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती असून इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर मानवेढे गाव आणि परिसरातील आक्रमक महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलनाला सुरुवात केली. जलजीवन योजने अंतर्गत मानवेढे येथे पाणीपुरवठा योजनेचे काम तांत्रिक कारणामुळे बंद असल्यामुळे मानवेढे आणि जांभचीवाडीसह परिसरातील अनेक वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लगतच असणार्‍या समृद्धीच्या कामासह इगतपुरी आणि घोटीच्या पाणी पुरवठा योजनेला पाणी दिल जात आहे. मात्र गावकरी पाण्यावाचून तहानलेले आहे. त्यामुळे संतापलेल्या महिला ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन करून समृद्धी आणि इगतपुरीचा पाणीपुरवठा बंद केला आहे.

पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणार नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा ईशारा आंदोलकांनी दिला आहे. गांवकर्‍यांची समजुत घालण्यासाठी इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड व इगतपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र गांवकरी आपल्या मागण्यासाठी आंदोलनावर ठाम होेते.

- Advertisment -

ताज्या बातम्या