Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिवस्वराज्य दिन आज होणार साजरा

शिवस्वराज्य दिन आज होणार साजरा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरसह राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी 9 वाजता सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी शिवस्वराज्य गुढी उभारुन त्यास अभिवादन करावे, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 रोजी हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतर रहावे, म्हणून राज्यभिषेक घेतला. तोच शिवराज्यभिषेक दिन आहे. याच दिवशी श्री शिवराज्यभिषेक शकाची निर्मिती करुन महाराज शककर्ते ही झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्यभिषेक करुन घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. त्यामुळेच या दिवसाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम राज्याचे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद इमारतीचे आवारामध्ये रविवारी सकाळी 9 वाजता होणार आहे. शिवशक राजदंड स्वराज्यगुढी यावेळी उभारण्यात येणार असून याचवेळी जिल्हा परिषद स्थापनेस 60 वर्षे पूर्ण झाल्याने जिल्हा परिषद हीरक महोत्सवाचा शुभारंभ आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर यांच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांचे ऑनलाईन शॉपींगसाठी साईज्योत ई मार्केट प्लेस या अ‍ॅपचा शुभारंभ पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या