Uddhav Thackeray Interview : झाडी-डोंगर फेम शहाजीबापूंवर उद्धव ठाकरे बरसले

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बहुप्रतिक्षित मुलाखतीमधील (Uddhav Thackeray Interview) पहिला भाग आज प्रसारीत करण्यात आला आहे. या मुलाखतीत सेना आमदारांमध्ये बंडाचं पहिलं निशाण फडकावणाऱ्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला.

‘महाराष्ट्र फार सुंदर आहे. ग्रामीण भागातील आमदारांना या निसर्गाची भुरळ पडत नाही, पण गुवाहाटीमधील निसर्गाची भुरळ पडते. महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्याची तुम्हाला ओढ, प्रेम नाही. त्याचं वैभव कधी दिसलं नाही,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

तसेच, ‘मी स्वत: कलाकार आहे. त्यावरुन सुद्धा चेष्टा झाली होती. मी पंढपुरच्या वारी, गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. त्यावेळी महाराष्ट्र पाहिला तर इतका नटलेला, थटलेला दिसतो. आम्ही तर शहरीबाबू आहोत, तुम्ही ग्रामीण भागातील आहात. पण ग्रामीण भागात राहूनही तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य कधी दिसलं नाही, त्याचं वर्णन करावंसं वाटलं नाही आणि थेट गुवाहाटी दिसलं. मी गुवाहाटी वाईट म्हणत नाही, प्रत्येक प्रदेश चांगला आहे. पण हे मातीसाठी काय करणार?,’ असा सवाल विचारत उद्धव ठाकरेंनी बापूंचा खरपूस समाचार घेतला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *