Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Andolan: ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची ठाकरे गटाची...

Maratha Andolan: ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची ठाकरे गटाची मागणी

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासाठी (Maratha Protest) उपोषणावर बसलेले जालन्यातले मनोज जरांगे (Manoj Jarange) आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी राज्य सरकारला ४ दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी मंत्र्यांचे शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचे मन वळवण्यात अपयश आले. या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली.

- Advertisement -

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर या शिष्टमंडळातील अंबादास दानवे (Ambadas Danave) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

“जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावात १ तारखेला मराठा समाजाच्या गावकऱ्यांवर माता-भगिनी, लहान मुलांवर, वृद्धांवर अमानुष लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जचा आदेश नेमका कुणी दिला? मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिला? कुणीही स्वीकारत नाही. प्रशासनाने स्वत: हा एवढा मोठा निर्णय घेतला? ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाई करावी. या मागणीसाठी आमच्या शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज राज्यपालांची भेट घेतली”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

Maratha Reservation : …तर देशभरात आंदोलन करू; ओबीसी महासंघाचा राज्य सरकारला इशारा

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणतात आम्ही आदेश दिले नाहीत, मग सरकार कसे चालू आहे. मुख्यमंत्र्यांना समन्स द्यावी यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. अनागोंदी सरकार सुरु आहे. गद्दार, घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये खरे जनरल डायर होण? ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले. त्यांची नावे लोकांसमोर येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

“राज्याचे गृहमंत्री एकीकडे माफी मागतात. गोवारी हत्याकांडाचे उदाहरण देतात. गोवारी हत्याकांड जेव्हा झाले होते तेव्हा राज्याचे तत्कालीन आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. म्हणून आम्ही आज मागणी करतोय. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी सुस्पष्ट मागणी आम्ही केली आहे. सारथीसाठी २२०० कोटी दिले, अशी घोषणा केली. पण मी माहिती काढली तर फक्त ३४ कोटी आतापर्यंत देण्यात आले आहेत”, असे अंबादास दानवे यावेळी म्हणाले.

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय

यावेळी आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, “आपल्या राज्यात एक घटनाबाह्य, गद्दार मुख्यमंत्री आण दोन उपमुख्यमंत्री या तिघांमध्ये खरे जनरल डायर कोण आहेत? ज्यांनी हे आदेश दिले. आदेश कोणी दिले हे लोकांसमोर आले पाहिजे. कारण आता चौकशी समिती बसवली जाईल, जशी खारघरमध्ये बसवली आहे. त्या चौकशी अहवाल अद्याप आला नाही. अहवाल येईल तेव्हा एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याला दोषी ठरवले जाईल आणि बडतर्फ केले जाईल”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, याप्रकरणात काय होईल हे मी आत्ताच सांगतो. समिती बसवली गेली आहे, रिपोर्ट आल्यानंतर एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याचे निलंबन केले जाईल. त्यामुळे ज्याने लाठीचार्जचे आदेश दिले त्याला काहीही होणार नाही, हे दुर्दैव आहे. राज्यपालांना यासाठीच आम्ही भेटलो. यावर कारवाई होईल अशी अपेक्षा. मुख्यमंत्र्यांनी थोडी लाच उरली असेल तर राजीनामा द्यावा, असं आदित्य म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या