Thursday, April 25, 2024
Homeनाशिकविधानसभा उपाध्यक्ष म्हणतात, दिंडोरीत महाविकास आघाडीविरुद्ध सगळे

विधानसभा उपाध्यक्ष म्हणतात, दिंडोरीत महाविकास आघाडीविरुद्ध सगळे

ओझे | वार्ताहर | Oze

शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेस पक्षाचे (Congress) महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) असल्याने विकासाला चालना मिळाली आहे, त्यामुळे दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र आणण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करु, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केले…

- Advertisement -

झिरवाळ म्हणाले की, दोन वर्षांत दिंडोरी शहराच्या विकासासाठी 55 ते 60 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे, त्यामुळे विकासाभिमुख दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत भूमिगत गटारी, रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण, काँक्रीटीकरण व पाणीपुरवठा यास प्राधान्य दिले आहे.

त्याचप्रमाणे ठिकठिकाणी हायमास्क लाईट बसून शहराला उजाळा दिला आहे. शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आघाडी करण्यासाठी बोलणार आहे, कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन नरहरी झिरवाळ यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या