Thursday, April 25, 2024
Homeराजकीयआदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर; तेजस्वी यादव यांची भेट... राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर; तेजस्वी यादव यांची भेट… राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दिल्ली | Delhi

युवासेनाप्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज एक दिवसीय बिहार दौऱ्यावर (Bihar) आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) यांच्यात भेट झाली आहे. या भेटीचे फोटो समोर आले आहेत.

- Advertisement -

तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचं शिवाजी महाराज यांची अर्धाकृती मूर्ती देत स्वागत केलं. तसेच आदित्यसोबतचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले. यावेळेस आदित्य यांच्यासोबत शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चर्तुवेदी याही होत्या.

राष्ट्रीय राजकारणात भाजपविरोधात मोर्चेबांधणी?

भाजपकडून केंद्रीय सत्तेचा वापर करून इतर राजकीय पक्षांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देशभरातील विविध विरोधी पक्षांकडून वारंवार केला जात असतो. त्यामुळे भाजपला केंद्रातील सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचा मुद्दा वारंवार अधोरेखित करण्यात येतो.

या अनुषंगाने याआधीही अनेकदा प्रयत्न केले गेले आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा देशव्यापी आघाडीसाठी प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्यात झालेल्या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या