Thursday, April 25, 2024
Homeनगरसेनेच्या दोन नगरसेवकांवर खंडणीचे गुन्हे

सेनेच्या दोन नगरसेवकांवर खंडणीचे गुन्हे

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

सुपे औद्योगिक वसाहतीत ट्रकचा व्यवसाय करू देण्यासाठी दर दरमहा पंधरा हजार रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांसह चौघांवर तसेच इतर विविध कलमांन्वये पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

पारनेर नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे व शुभम देशमुख, मयुर शिवा चौरे व गणेश पठारे (सर्व रा. पारनेर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यासंदर्भात प्रवीण गायकवाड (रा. तराळवाडी ता. पारनेर ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2021 रोजी पारनेर येथील कन्हेर ओहळ येथे युवराज पठारे व शुभम देशमुख या दोंघांनी औदयोगिक वसाहतीत ट्रका चालवायच्या असतील तर पंधरा हजार रूपये महिन्याप्रमाणे आम्हाला हप्ता द्यावा लागेल अशी दमदाटी केली.

भीतीपोटी गायकवाड यांनी त्यांना पैसे देण्याचे कबुल केले. 15एप्रिल 2021 रोजी हप्त्यासाठी दोघांनी दमदाटी केली. त्यानंतर शुभम देशमुख याच्या फोन पे नंबरवर वेळोवेळी 11 वेळा एकूण 1 लाख 87 हजार 500 रूपये पाठविले. एप्रिल 2022 या महिन्याचा हप्ता दिला नाही म्हणून युवराज पठारे याने 13 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोबाईलवरून संपर्क करून पैशांची मागणी केली. त्याच दिवशी कारखान्याची साखर भरलेला ट्रक घेऊन मुंबईकडे निघाल्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास युवराज पठारे, शुभम देशमुख, मयुर चौरे व गणेश पठारे यांनी ट्रक अडविली. ट्रकखाली ओढून मारहाण करण्यात आली.

या दरम्यान शुभम देशमुख याने खिशातील 30 हजार रूपये, गळयातील चेन काढून घेतली. शिविगाळ करीत जीवे मारून टकाण्याची धमकी दिली. तसेच ट्रक घेऊन पसार झाले. दरम्यान पुणेवाडी फाट्याच्या दरम्यान डिझेल संपल्याने ट्रक बंद पडलेला आढळला. गायकवाड यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी झाल्यानंतर आपण फिर्याद दाखल करीत असल्याचे गायकवाड यांनी फिर्यादीत नमुद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या