Saturday, April 27, 2024
Homeनगरशिवसेना नगर शहरप्रमुख पदाला स्थगिती

शिवसेना नगर शहरप्रमुख पदाला स्थगिती

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

अवैध बायोडिझेल तस्करी प्रकरणात (Illegal Biodiesel Smuggling Case) दिलीप सातपुते (Dilip Satpute) याच्यावर गुन्हा दाखल (Filed a Crime) झाल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख पदावरून (Shivsena City Chief Post) तत्काळ हटविण्यात (Remove) आले आहे. नगर शहर प्रमुख पदाला स्थगिती (Postponement of the Post of City Head) देण्याबाबत शिवसेनेच्या मुखपत्रातून अधिकृतपणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन शहर प्रमुखाची नियुक्ती लवकरच केली जाईल, असेही शिवसेनेकडून (Shivsena) स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोतवाली पोलीस (Kotwali Police) व पुरवठा विभागाने (Supply Department) केडगाव बायपास परिसरात अवैध बायोडिझेल (Illegal Biodiesel) पकडले होते. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यात सातपुते (Dilip Satpute) याचा सहभाग निष्पन्न झाला असल्याने पोलिसांनी त्याला आरोपी केले आहे. तो पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दुसरीकडे गुन्हा दाखल होताच शिवसेनेकडून सातपुते याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. नगर शहर शिवसेनाप्रमुख पदाला स्थगिती देण्यात आल्याबाबत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून (Shivsena Central Office) अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. मुखपत्रातून याबाबत अधिकृतपणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन शहर प्रमुख पदाची नियुक्ती लवकरच केली जाईल, असेही या वृत्तामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या