Photo Gallery : शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप; नाशिक भगवेमय

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ठीकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जय जिजाऊ जय शिवराय’चा जयघोष सुरु आहे….

महाराष्ट्रात सर्वप्रथम नाशिकमध्ये म्हसरूळचे शिवप्रेमी प्रकाश उखाडे यांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची देखनीय अशीच छबी असलेला चांदीचा टाक देव्हार्‍यात विराजमान केला आहे. या टाक पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने उभारण्यात आलेला देखावा हा जिल्ह्यात सर्वाधिक मोठा देखावा ठरला आहे. शहरात विविध ठिकाणी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक शिवरायांना नमन करत आहेत.

छात्रभारती विद्यार्थी संघटनेची वैचारिक शिवजयंती साजरी केली आहे. छत्रपती शिवराय यांचे विचार प्रत्येक विद्यार्थी – तरुणांच्या मनामनात – घराघरात पोहचवण्याची गरज आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून छात्रभारती शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक ५ लाख विद्यार्थी-तरुणांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल, गजानन शेलार यांच्यासह अन्य मान्यवरांनी सीबीएस येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांना वंदन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *