Wednesday, April 24, 2024
Homeधुळेधुळ्यात 400 जणांना शिवभोजन

धुळ्यात 400 जणांना शिवभोजन

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

लॉकडाऊन काळात गरजुंना दोन वेळचे शिवभोजन देण्यात येत असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे. शहरात 400 जणांना भोजनाचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन काळात गरंजूचा रोजचा जेवणाचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने शिवभोजन योजना सुरु केली आहे. शहरात दोन ठिकाणी ही योजना सुरु केली आहे.

त्यात कमलाबाई हायस्कूलसमोर असलेले शिवभोजन येथे 150 जणांना जेवणाची तर बसस्थानकासमोर 250 जणांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या योजनेची दोन्ही ठिकाणी आजपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. ही योजना 30 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. शहरातील दोन्ही केंद्रांवर भोजन घेण्यासाठी रांगा लागण्याचे दिसून आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या